राज्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांना नियमांचे पालन करावे असे आवाहन केले जात आहे. तसेच कोरोनाच्या रुग्णांवर योग्य उपचार मिळावेत म्हणून डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांकडून दिवसरात्र उपचार केले जात आहेत. अशातच यवतमाळ मधील एक धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यानुसार घाटंजी येथील कोविड केअर सेंटरमधून कोरोनाच्या जवळजवळ 20 रुग्णांनी पळ काढला आहे.त्यामुळे आता मोठी खळबळ उडाली आहे.(Remdesivir Updates in Maharashtra: दिलासादायक! अखेर महाराष्ट्राला केंद्राकडून मिळाला रेमडेसिवीरचा ज्यादा पुरवठा, मुख्यमंत्र्यांनी PM Modi चे मानले आभार)

या प्रकरणी वैद्यकिय अधिकारी संजय पुराम यांच्याकडून पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान शुक्रवारी कोरोनाची तपासणी केली असता तेव्हा काहींचे कोरोनाचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले. त्यानंतर त्या सर्वांना कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु पळ काढलेल्यांपैकी काही जणांचा शोध घेऊन त्यांना आता विलगिकरणात ठेवल्याचे ही सांगितले जात आहे.(Coronavirus Vaccination: महाराष्ट्रात 18 ते 45 वयोगटातील सर्वांना कोरोनाची लस मोफत दिली जाणार, राज्य सरकारकडून घोषणा)

तर मुंबई महापालिका नजिकच्या काळात 16 ऑक्सिजन प्लांट आणि 12 रुग्णालयं उभारणार आहे. मुंबई पालिका आयुक्त एक्बालसिह चहल यांच्या मार्गदर्शाखाली हे प्लांट उभारले जातील. तसेच, अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू हे या प्लांटच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवतील. ऑक्सिजन प्लांटमधून 43 मेट्रीक टन ऑक्जिन निर्मीती होईल, असे मुंबई महापालिकेने म्हटले आहे.