महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र लसीकरण मोहिमेनुसार नागरिकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहन करण्यात येत आहे. अशातच येत्या 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वांना कोरोनाची लस दिली जाणार असल्याचे नुकतेच केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आले होते. अशातच आता महाराष्ट्र सरकारमधील कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी या संदर्भातील एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, राज्यातील 18 ते 45 वर्षादरम्यान व्यक्तींना कोरोनाची लस मोफत दिली जाणार आहे.(Mumbai Sero Survey: मुंबईमधील 36 टक्के लोकांना कोरोना झाल्याचे समजलेच नाही; सीरो सर्वेक्षणामधून धक्कादायक माहिती)
मलिक यांनी पुढे असे म्हटले की, भारतात दोन लस उपलब्ध आहेत. कोविशील्डसाठी दर जाहीर केले आहेत. केंद्र सराकरला ही लस 150 रुपयांना मिळणार असून राज्यांना त्यासाठी 400 रुपये आणि खासगी संस्थाना 600 रुपयांना मिळणार आहे. कोवॅक्सिनने सुद्धा त्यांचे दर जाहीर केले आहेत. राज्य सरकारांना ती 600 रुपये आणि केंद्राला 150 रुपयांसह खासगी रुग्णालयांना 1200 रुपयांना दिली जाते. त्यामुळे त्यांनी असे म्हटले की, याचे दर एकसारखे नाहीत. आम्ही कॅबिनेटमध्ये यावर चर्चा केली की, 18 ते 45 दरम्यान वर्षावरील लोकांना मोफत लस दिली जाणार आहे. आम्ही ग्लोबल टेंडर्सला आमंत्रित करणार असून कमीतकमी दरात योग्य लस घेणार आहोत. तसेच राज्यात व्यापक लसीकरण अभियान चालवणार असून त्यामुळे महाराष्ट्र कोरोनामुक्त होण्यास मदत होईल.(सध्या दोनचं कंपन्यांना लस उत्पादनाची परवानगी देऊन मक्तेदारी निर्माण करत केंद्र सरकार लोकांच्या जिवाशी खेळतंय - नाना पटोले)
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार गेल्या 24 तासात कोरोनाचे 3,49,691 रुग्ण आढळले आहेत. तर 2767 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 2.17,113 जणांची प्रकृती सुधारली आहे. सर्वाधिक प्रकरणे ही महाराष्ट्रातील आहेत. त्यानंतप उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि दिल्ली येथे रुग्णांचा आकडा अधिक आहे.