रायगड (Raigad) जिल्ह्यातील महाड (Mahad) येथील तळीये गाव (Taliye Village) दरड कोसळून उद्धवस्त झाले आहे. तर अतिवृष्टीमुळे महाड शहराचे अतोनात नुकसान झाले आहे. या शहराला पुन्हा सावरण्यासाठी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज महसूल विभागाने तयार केलेल्या मदत केंद्राला भेट देऊन ताताडीने आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी शहर स्वच्छतेसाठी तातडीचा निधी जाहीर केला असून पुढील दोन दिवसांत हा निधी वितरीत करणार असल्याची घोषणा केली आहे. टीव्ही9 च्या वृत्तानुसार, महाड शहर स्वच्छतेसाठी 50 लाखांचा निधी देण्यात येणार आहे.
महाड शहर स्वच्छ करण्यासाठी वेगवेगळ्या नगरपालिकांचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसंच ठाणे महानगरपालिकेने पाठवलेली ड्रेनेज स्वच्छ करणारे टँकर्स आणि पुणे महानगरपालिकेने पाठवलेले जनरेटर्स तातडीने स्थानिक प्रशासनाला सुपूर्त करण्यात आले आहेत. त्याचबरोबर उद्यापासून स्वच्छता मोहीम हाती घेऊन 4 दिवसांत महाड शहर पूर्णपणे स्वच्छ करण्याचे आदेश त्यांनी स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. (Mahad, Raigad Landslide: दरड कोसळून उद्धवस्त झालेलं तळीये गाव म्हाडा वसवणार; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची घोषणा)
Eknath Shinde Tweets:
#महाड मध्ये झालेल्या प्रलयंकारी पावसात संपूर्ण महाड शहराचे अतोनात नुकसान झालेले आहे. या पुरानंतर या शहराला पुन्हा सावरण्यासाठी आज महसूल विभागाने तयार केलेल्या मदत केंद्राला भेट देऊन ताताडीने आढावा बैठक घेतली. pic.twitter.com/DigPcDnRLS
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 24, 2021
तर शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून वैद्यकीय पथकाचा कॅम्प शहरात सुरू केला जाणार असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.शहर स्वच्छ करण्यास प्राथमिकता असल्याने उद्यापासून स्वच्छता मोहीम हाती घेऊन ४ दिवसात महाड शहर पूर्णपणे स्वच्छ करावे असे स्थानिक प्रशासनाला निर्देशित केले.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 24, 2021
शहर स्वच्छ करण्यासाठी लागणारी डीडीटी पावडर, डीटर्जंट आणि जंतूंनाशक खरेदी करावे, शहर स्वच्छ करण्यासाठी फायर ब्रिगेडची वाहने, शहरात घरे दुकाने याबाहेर साचलेला कचरा उचलण्यासाठी डंपर, जेसीबी भाडेतत्त्वावर घ्यावे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. तसंच जागोजागी अडकलेली वाहने काढण्यासाठी हायड्रो क्रेन घ्याव्या, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
त्याचबरोबर घरे, दुकाने यांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून मदत म्हणून घरटी 5 हजार रुपये तातडीने देण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला या बैठकीत दिले आहेत. याशिवाय शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून वैद्यकीय पथकाचा कॅम्प शहरात सुरू केला जाणार असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.