महाविकास आघाडी पक्ष प्रमुख । Photo Credits: PTI

महाराष्टात 2019 मधील विधानसभा निवडणुकीमुळे अनेक राजकीय गणिते बदलून गेली. शिवसेना-भाजप (Shivsena-BJP) यांची युती तुटल्यामुळे महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) उदयास आली. तीन पक्ष एकत्र आल्याने मुखमंत्री उद्धव ठकारे यांना फार मोठा पाठींबा निर्माण झाला. आता महाविकास आघाडी आशियातील सर्वात मोठी निवडणूक (Asia's Biggest Election) लढवण्याच्या मार्गावर आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची (Mumbai Agricultural Produce Market Committee) निवडणूक लढविण्यासाठी पुन्हा एकदा तीनही पक्षांनी एकत्र येऊन मोर्चेबांधणी सुरु केली आहे. 29 फ्रेबुवारी रोजी ही निवडणूक पार पडणार आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशियातील सर्वात मोठी बाजार समिती म्हणून ओळखली जाते. 2014 पर्यंत इथे राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांची सत्ता होती. मात्र त्यानंतर राज्यात भाजपचे सरकार आले व इथे प्रशासकाची नेमणूक करण्यात आली.

आता तब्बल 10 वर्षांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होत आहे. आता सत्ता बदल झाल्यानंतर महाविकास आघाडीने ही निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला आहे. काल तीनही पक्षांच्या झालेल्या बैठकीमध्ये याबाबत चर्चा झाली, त्यानंतर सहकार आणि पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली. गुरुवारी महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने या निवडणुकीत रस दाखवल्याने आता त्यांच्यासोबत शिवसेनाही मैदानात उतरली आहे. (हेही वाचा: राज्य सरकारकडून विदर्भातील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना 68 कोटी 94 लाख रुपये मदत जाहीर; मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती)

दरम्यान, 15 जानेवारी, 1977 रोजी, अधिनियम, 1963 च्या तरतुदीनुसार मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन झाली. राज्यातील सहा महसूल विभागातून 12 शेतकरी प्रतिनिधी समितीच्या संचालक मंडळावर निवडून येणार आहेत. सध्या या निवडणुकीसाठी 180 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत. सध्या एकूण 18 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. 15 फेब्रुवारी रोजी चिन्हांचे वाटप होऊन, 2 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.