
कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाविरुद्ध अवघा महाराष्ट्र मोठ्या हिमतीने लढतो आहे. विशेष म्हणजे या लढ्या आता रोबोटसुद्धा उतरणार आहे. होय, टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीने बनवलेला हा रोबोट डॉक्टरांची मदत करणार आहे. मेडी-रोवर रोबोट (Medi-Rover Robot) असे त्याचे नाव असून, तो अत्याधुनिक आहे. चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी हा रोबोट आरोग्य यंत्रणेकडे सुपूर्त केला आहे. हा रोबोट आजपासून (9 मे 2020) रुग्णसेवेत दाखल होत आहे.
जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी या रोबोटविषयी बोलताना सांगितले की, हा रोबोट डॉक्टरांची मदत आणि रुग्णसेवा करण्याच्या कामी येणार आहे. भविष्यात या रोबोटला अधिक कार्यरत बणवून त्याचा वापर नमुने तपासणीसाठी करता येणार येऊ शकतो काय, याबाबतही विचार केला जाणार आहे.
दरम्यान, मुंबई, पुणे आणि राज्यातील इतर काही जिल्ह्यांमध्ये कोविड 19 हा विषाणून मोठ्या झपाट्याने हातपाय पसरवत आहे. असे असताना चंद्रपूर जिल्हा मात्र अगदी अलिकडे कोरोनामुक्त राहिला होता. मात्र, नजिकच्या काळात चंद्रपूरातही एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू नये यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासन मोठ्या प्रमाणावर सक्रीय झाले आहे. त्यातच आता हा मेडी-रोवर रोबोट सुद्धा रुग्णसेवेत उतरला आहे. कोरोना रुग्ण आणि वैद्यकीय कर्मचारी यांचा अधिकाधिक कमी संपर्क यावा यासाठी हा रोबोट काम करणार आहे. (हेही वाचा, प्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमकं काय? यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल? जाणून घ्या प्लाझ्मा थेरपीचे फायदे, इतिहास, उपचारपद्धती याबद्दल सविस्तर माहिती)

Medi-Rover Robot |
टाटा टेक्नॉलजी प्रोजेक्ट मॅनेजर मनीष कुमार, यांत्रिकी अभियंता जीवन काळे, दानिश पठाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी या रोबोटची निर्मिती केली आहे. चंद्रपूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील सीआयआयटी प्रयोगशाळेत या रोबोटची निर्मिती करण्यात आली. रोबोटच्या तांत्रिक माहितीबद्दल सांगायचे तर, रोबटची वाहक क्षमता 30 किलो इतकी आहे. तर 10 मीटर अंतरापर्यंत हा रोबोट ऑपरेट करता येऊ शकतो.