LS Polls 2019 Phase 2 Voting (Photo Credits: Facebook)

Lok Sabha Elections 2019 Phase 2 Voting:  भारतामध्ये 18 एप्रिल दिवशी लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections) मतदानाचा दुसरा टप्पा पार परडणार आहे. यामध्ये देशातील 13 विविध राज्यातील 95 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 10 मतदार संघांचा समावेश आहे. बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर येथे मतदान पार पडेल. महाराष्ट्रातील दुसर्‍या टप्प्यातील मतदानामध्ये अशोक चव्हाण (Ashok Chavan), सुशील कुमार शिंदे (Sushil Kumar Shinde), प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar), प्रीतम मुंडे (Preetam Munde) यांच्या सारख्या दिग्गज राजकारण्यांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे. Lok Sabha Election 2019 Dates: मुंबई, पुणे, नाशिक, कोकण मध्ये कधी आहे लोकसभा निवडणूक 2019 मतदान? पहा महाराष्ट्र राज्यातील 48 मतदारसंघाचं संपूर्ण वेळापत्रक

सोलापूरमध्ये सुशील कुमार शिंदे यांची लढत वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि भाजपाचे डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांच्यासोबत होणार आहे. काल त्यांनी ही आपण लढत असलेली शेवटची निवडणूक असल्याचंही म्हटलं आहे. नांदेडमध्ये कॉंग्रेसच्या अशोक चव्हाणांची लढत भाजपाच्या प्रताप चिखलीकरांसोबत होणार आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघ: अशोक चव्हाण यांच्या बालेकिल्ल्यावर भाजपचा डोळा, पंतप्रधान मोदींची सभा प्रताप चिखलीकर यांच्यासाठी ठरणार निर्णायक?

महाराष्ट्रात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात होणार आहे. मतदानादिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली असली तरीही नागरिकांना घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यंदा ऑनलाईन स्वरूपात मतदार यादीमध्ये नाव, मतदान केंद्र यांची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे मतदार आणि निवडणूक आयोगाच्या कर्मचार्‍यांचा बराचसा वेळ वाचण्यास मदत होणार आहे.Lok Sabha Election 2019: घरबसल्या मतदार यादीमध्ये तुमचं नाव, मतदान केंद्र कसं पहाल?

केंद्रीय मंत्री जु्एल ओरांव, सदानंद गौडा आणि पी राधाकृष्णन, माजी पंतप्रधान एच डी देवगौडा, काँग्रेस नेते एम वीरप्पा मोइली (राज बब्बर), नॅशनल कॉन्फ्रेंस अध्यक्ष फारुक अब्दुल्ला, भाजप नेते हेमा मालिनी आणि द्रमुकचे दयानिधी मारन, ए राजा, भाजपचे एसपी बघेल, अमरोहा येथून बसपा उमेदवार दानिश अली आमि कनिमोई यांचं भवितव्यही मतदान पेटीत बंद होणार आहे.