वसई (Vasai) येथील एका तरुणीच्या प्रेमाचा करुण अंत झाला आहे. तरुणीच्या एका माजी प्रियकराने तिच्या विद्यमान प्रियकराची हत्या (Murder) केली आहे. दीपक कटुकर (20) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो 12 मे पासून बेपत्ता होता. अखेर 14 मे रोजी वसई खाडीत ( Vasai Creek) त्याचा मृतदेह आढळून आला. कांदिवली पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, दीपक काटुकर या तरुणाची हत्या 12 मे रोजी घडली. त्या दिवशी तो घरुन मित्राला भेटायला म्हणून गेला होता. मात्र नंतर तो परत आलाच नाही. त्याच्या आईने पोलिसांना सांगितले की, आगोदर ते कंदिवली पूर्व येथे राहात असल्यानेच त्याचे मित्र त्या परीसरातही होते. त्यांनाच भेटण्यासाठी तो घरातून बाहेर गेला होता.
पोलिसांनी सांगितले की, दीपक कटुकर याच्या मोबाईलवरील डेटा रेकॉर्डवरुन आम्ही तपास केला असता तो दोन मित्रांच्या संपर्कात होता असे आढळून आले. पोलिसंनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की तो आम्हाला भेटला होता. मात्र त्यानंतर तो कांदिवली पश्चिम येथील सरोवर हॉटेलमध्ये सूरज विश्वकर्मा (२७) नावाच्या व्यक्तीला भेटायला गेला होता. त्यांना काही खासगी गोष्टींवर चर्चा करायची असल्याचे सांगत ते दोघे निघून गेले होते. दरम्यान, दीपक काटुकर याच्या एका मित्राने आणि त्याच्या आईने दावा केला की विश्वकर्माने कटुकरची हत्या केली आणि त्याचा मृतदेह परिसरातील नाल्यात फेकून दिला. आम्ही चार नाले तपासले पण त्याचा शोध लागला नाही, असेही पोलिसांनी पुढे म्हटले. (हेही वाचा, Dombivali Crime: डोंबिवलीत एका 58 वर्षीय महिलेची हत्या, पोलिसांनकडून चौवीस तासाच्या आत गु्न्हयाचा उलगडा)
दरम्यान, पोलिसांना विश्वकर्मा याचाही फोनकॉल डेटा मिळाला. त्यात पुढे आले की, दीपक काटुकार जेव्हा बेपत्ता झाला त्या दिवशी तो भाईंदर रेल्वे पुलाजवळ होता. तसेच, विश्वकर्मा याच्याशी संपर्क केला तेव्हा तो मुंबई सोडून उत्तर प्रदेशातील जैनपूर या गावी गेला होता. त्यानंतर पोलिसांनी एक पथक नेमून विश्वकर्मा याला अटक केली. त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आपले आपल्या प्रेयसीवर प्रचंड प्रेम असल्यानेच आपण तिच्या प्रियकराची हत्या केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
विश्वकर्मा याने सांगितले की, प्रेयसी आणि त्याचे पूर्वी संबंध होते. परंतू तिच्या कुटुंबाच्या दबावामुळे काही वर्षांपूर्वी त्यांचे ब्रेकअप झाले. कटुकरसोबत तिचे संबंध आल्याने तो संतापला आणि त्याने त्याला मारण्याचा त्याने निर्णय घेतला.
पोलिसांनी सांगितले की, कांदिवली येथे कटुकरला घेऊन तो भाईंदरला गेल्याचे विश्वकर्मा याने पोलिसांना सांगितले. त्यांनी बिअर विकत घेतली आणि ते रेल्वे पुलावर चालत असताना कटुकरला खाडीत ढकलून त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला, अशी कबुलीही विश्वकर्माने दिल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.