Loksabha Elections Results 2019:  नागपूरमध्ये मतमोजणी थांबवण्याची मागणी, जाणून घ्या कारण
नितीन गडकरी (संग्रहीत आणि संपादित प्रतिमा)

 नागपूर: लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019) साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली असून,पोस्टल बॅलेटच्या मोजणीनुसार सध्या देशात 105 ठिकाणी भाजपा आघाडी कडे कल दिसून येत आहे मात्र महाराष्ट्रातील महत्वाचा मतदारसंघ नागपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मतमोजणी थांबविण्याची मागणी केली जातेय. नागपूरमध्ये भाजपा उमेदवार व विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या विरोधात काँग्रेस उमेदवार नाना पटोले (Nana Patole) यांच्यात प्रमुख लढत पाहायला मिळत आहे.

निवडणुकीचे मतदान पार पडले त्यादिवशी मतदान केंद्रावर आणण्यात आलेल्या EVM मशिन्स व आता मतमोजणीसाठी वापरण्यात येणाऱ्या मशिन्स यांच्यात भेद असल्याचा आरोप केला जात आहे. मतदान केलेल्या EVM मशीन वर असलेला सिरीज नंबर व मतमोजणीच्या मशीनचा नंबर वेगळा असल्याचे निदर्शनास आल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. या बाबत तपास सुरु असून तूर्तास काँग्रेसकडून मतमोजणी थांबिवण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, एक्झिट पोल्सनी भाजप-शिवसेना युतीला अनुकूल तर, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला प्रतिकूल अंदाज दर्शवले आहेत. या पार्श्वभूमीवर हाती येत असलेली निकालाची आकडेवारी उत्सुकता वाढवणारीदेशभरात सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरवात झाली असून येत्या काहीच वेळात निकाल हाती येणार आहेत.