बाळ गंगाधर टिळक (Bal Gangadhar Tilak) म्हणजेच लोकमान्य टिळकांची (Lokmanya Tilak) एक वेगळी ओळख महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणात (Politics), समाजकारणात आणि इतिहासात (History) आहे. चळवळीचे धडाडीचे नेते म्हणजे टिळक, न्यायाविरुध्द आवाज म्हणजे टिळक, संस्कृतीची जपणूक म्हणजे टिळक. लोकमान्यांची जन्मभूमी कोकण (Konkan) असली तरी कर्मभूमी पुणे (Pune) हे म्हणणं नाकारता येणार नाही. लोकमान्यांनी त्यांचं शिक्षण (Education), सगळ्या मोठ्या उठावाचे निर्णय, चळवळींची सुरुवात पुण्यातूनचं केली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे वाक्य कुठेही ऐकलं किंवा वाचलं तरी लगेच टिळकांचा चेहरा पुढे उभा राहतो. लोकमान्यांनीचं स्वराज्याचा मंत्र सामान्य जनतेच्या हृदयापर्यंत पोहोचवला. लोकमान्य टिळक हे नुसते कल्पनावादी नव्हते, तर ते भारतीय स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी, संपादक आणि लेखकही होते.
लोकमान्यांच्या व्यक्तिमत्त्व, लेखणी आणि वक्तृत्व हे फक्त महाराष्ट्रातचे नाही तर संपूर्ण भारताचे नेते होते. बाळ गंगाधर टिळक हे त्यांचं खरं नाव असलं तरी जनतेने त्यांना ’लोकमान्य’ ही पदवी दिली. लोकमान्यांनी विविध हिंदू संस्कृती, परंपरेचं जतन केल आणि गणेशोत्सवासारख्या सार्वजनिक उत्सवाला सुरुवात केली. आज याचं लोकमान्य नेत्याची पुण्यतिथी आहे. तुमच्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून WhatsApp Status, Photos शेअर करत तुम्ही या त्यांना अभिवादन करु शकता.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी
लोकमान्य टिळकांची आज 102 वी पुण्यतिथी आहे. टिळक आज आपल्यात नसले तरी टिळकांचे विचार, टिळकांनी दिलेली शिकवण आणि त्यांनी सुरु केलेले सण उत्सव आज आपल्याबरोबर आहेत. कुठल्या एका दिवशी टिळकांना नतमस्तक व्हावे असे टिळक नाही तर टिळकांचा विचार रोज जोपासावा असे टिळक आहेत.