Voter voted the right to vote | (Photo Credits: ANI/Twitter)

Lok Sabha Elections 2019: मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सांगली (Sangli) येथील मतदार संपतराव पाटील यांचे स्ट्रेचरवरुन आगमन झाले. संपतराव पाटील (Sampatrao Patil) हे निवृत्त शिक्षक आहेत. लोकसभा निवडणुकीत मतदान बजावण्यासाठी स्ट्रेचरवरुन आल्याने लोकशाहीतील त्यांच्या योगदानाचे कौतुक केले जात आहे. पाटील यांनी सांगलीवाडी येथे प्रशासनाच्या मदतीने सांगली लोकसभा मतदारसंघात (Sangli Lok Sabha Constituency) मतदानाचा हक्क बजावला.

दरम्यान, निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव. या उत्सवात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील अनेक वृद्ध नागरिकांनीही आपला सहभाग नोंदवला. उमेदवार आणि राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्त्यांचे बुजुर्ग आणि ज्येष्ठ तसेच वयोवृद्ध आई-वडील, पालक, नातेवाईकांनीही मतदानाचा हक्क बजावला. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार, शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे या नेत्यांच्या मातोश्रींचाही समावेश आहे. (हेही वाचा, VVPAT मशीनमधून निघाला भलादांडगा साप, मतदान ठप्प; केरळ राज्यातील Kannur मतदारसंघातील घटना)

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बाजावला मतदानाचा हक्क

महाराष्ट्रातील वृद्ध दाम्पत्यानेही बजावला मतदानाचा हक्क

दरम्यान, महाराष्ट्रातील ज्येष्ठ दाम्पत्य प्रभाकर आणि सुशीला भिडे यांनी बजावला मतदानाचा अधिकार बजावला. या दाम्पत्याचे वय वर्षे अनुक्रमे 98 आणि 88 असे असल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.