Snake inside VVPAT machine | (Photo: Representational)| Photo Credit: Pixabay IANS)

Lok Sabha Elections 2019: केरळ (kerala) राज्यातील कन्नूर लोकसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर मतदान ठप्प झाले आहे. Kannur येथे VVPAT यंत्रातून भलादांडगा साप बाहेर आल्याने मतदान थांबविण्यात आल्याचे समजते. लोकसभा निवडणूक 2019 साठी तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडत असताना आज (बुधवार, 23 एप्रिल 2019) सकाळी ही घटना घडली.

मैत्रभूमी डॉट कॉम नावाच्या एका इग्रची संकेतस्थळाने याबाबत वृत्त दिले आहे. तसेच, तिरुवअनंतपूरम येथील काँग्रेस उमेदवार शशी थरुर (Shashi Tharoor) यांनीही हे वृत्त आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर केले आहे. मैय्यिल कंडाक्कई (Mayyil Kandakkai) या मदान केंद्रावर हा प्रकार घडला. सापाला पाहून मतदारांमध्ये एकछ खळबळ उडाली. मतदार आणि निवडणूक अधिकाऱ्यांमध्येही काही काळ भीतीचे वातावरण तयार झाले.

Kannur मतदारसंघातून विद्यमान खासदार आणि सीपीआय-एम-एलडीएफ पक्ष उमेदवार पी. के. श्रीमेथी (MP P K Sreemathy (CPI-M-LDF) आणि काँग्रेस -यूडीएफ उमेदवार के सुरेंद्रन (K Surendrdan (Cong-UDF)) तसेच, भाजप प्रणित एनडीए उमेदवार सी. के. पद्मनाभन (C K Padmanabhan (BJP-NDA)) यांच्यात लढत होत आहे. (हेही वाचा, येथे देव नाही तर साप पूर्ण करतात भक्तांच्या इच्छा)

दरम्यान, अल्पावधीतच दहशत दाखवणाऱ्या सापाचा निवडणूक अधिकाऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीने बंदोबस्त केला. त्यानंतर मतदान सुरळीत सुरु झाले. सध्या या मतदान केंद्रावर मतदान सुरु असून, मतदारही निर्भीडपणे मतदानचा हक्क बजावत असल्याचे समजते.