Navneet Rana, Anandrao Adsul | (Photo credit: facebook navneet.kaurrana.5,archived, edited and representative images only)

Lok Sabha Elections 2019: अमरावती लोकसभा मतदारसंघ (Amravati Lok Sabha Constituency) सध्या लक्ष्यवेधी ठरला आहे. या मतदारसंघातून युतीचे उमेदवार म्हणून विद्यमान शिवसेना (Shiv Sena) खासदार आनंदराव अडसूळ रिंगणात (Anandrao Adsul)आहेत. तर, त्यांच्या विरोधात काँग्रेस (Congress)-राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)-रिपाई (RPI) युवा स्वाभिमानी आघाडीच्या उमेदवार उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) या मदानात आहेत. इथे प्रमुख लढत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी असली तरी, वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) राज्यात पर्यायी राजकारणाचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. अमरावती येथून वंचित बहुजन आघाडीच्या गुणवंत देवपारे यांच्या उमेदवारीमुळे सुरुवातीला दुरंगी वाटणारी ही लढत आता तिरंगी होणार आहे. शिवाय काही अपक्षांचे उपद्रवमुल्यही नजरअंदाज करता येणार नाही. अशा स्थितीत अमरावती लोकसभा मतदारसंघातील घडामोडींवर टाकलेली ही एक नजर.

अमरावतील लोकसभेतील उमेदवार ही विकास आणि लोकाभिमुख चेहरा अशा दोन मुद्द्यांभोवती फिरत असल्याचे चित्र आहे. विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांचा लोकाभिमुख चेहरा. त्याला गेल्या पाच वर्षात मिळाळालेली केंद्रातील सत्तेची रसद आणि युतीच्या बळासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्याचे वलय एका बाजूला. तर, पुर्वाश्रमीच्या तेलुगू अभिनेत्री आणि सत्तेला आव्हान देणारा तसेच, विकासाच्या मुद्द्यावर गर्दी खेचणारा चेहरा असलेल्या नवनीत राणा दुसऱ्या बाजूला अशी ही लढत आहे. गुणवंत देवपारे यांनीही जातीय समिकरणे आणि वंचित बहुजन मतदारांना घातलेली साद महत्त्वाच्या भूमिकेत आहे.  (हेही वाचा, Lok Sabha Elections 2019: महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघ आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप उमेदवार संपूर्ण यादी)

अमरावती लोकसभा मतदारसंघ रचना

अमरावती लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ आणि आमदार
विधानसभा मतदारसंघ आमदाराचे नाव राजकीय पक्ष
बडनेरा रवी राणा अपक्ष
अमरावती डॉ. सुनील देशमुख भाजप
तिवसा अॅड. यशोमती ठाकुर काँग्रेस
दर्यापूर (SC) रमेश बुंदेले अपक्ष
मेळघाट (ST) प्रभुदास भिलावेकर भाजप
अचलपूर बच्चू कडू अपक्ष

लोकसभा निवडणूक 2014 लढत आणि पार्श्वभूमी

2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघात प्रामुख्याने थेट लढत ही आनंदराव अडसूळ आणि नवनीत राणा यांच्यातच झाली होती. या निवडणुकीत अडसूळ यांना 4 लाख 67 हजार 212 मते मिळाली होती. तर, नवनीत राणा यांना 3 लाख 29 हजार 280 मते मिळाली होती. विजेता समजली जाणारी प्रथम क्रमांकाची मते राना यांना मिळवता न आल्याने सर्वाधिक मते मिळवणारा उमेदवार म्हणून शिवसेचे आनंदराव आडसूळ यांनी विजय संपादन केला. (हेही वाचा, महाराष्ट्राचे राजकारण ढवळून टाकणारे बहुचर्चीत लोकसभा मतदारसंघ आणि लक्ष्यवेधी लढती)

Amravati Lok Sabha Constituency MP 1991 TO 2019 | (Photo credit: archived, edited and representative images only)

अमरावती हा मतदारसंघ खरं म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला. स्वातंत्र्यानंतरची बरीच वर्षे (जवळपास 7 टर्म) या मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार मताधिक्याने निवडूण येत असे. गेली दोन टर्म या मतदारसंघातून शिवसेना उमेदवार मताधिक्याने निवडूण येत आहे. या पार्श्वभूमिवर 2019 ची निवडणूक यंदा उत्सुकतेची ठरली आहे.