महाराष्ट्रातील काँग्रेस पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो, वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम: अशोक चव्हाण
Ashok Chavan | (Photo Credit : Facebook)

Lok Sabha Election Results 2019:  लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या काँग्रेसच्या पराभवाला इतर कोणी नव्हे तर, प्रदेशाध्यक्ष म्हणून  व्यक्तिगतरित्या मी जबाबदार आहे. या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो, असे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचा फटका काँग्रेसला बसल्याचेही अशोक चव्हाण यांनी म्हटले. तसेच, वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

दरम्यान, नारायण राणे हे पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी करणार असल्याची चर्चा आहे, असे विचारले असता, याबाबत त्यांचे (राणे) आणि माझे बोलणे झाले नाही. तसेच, सध्यास्थितीत तरी प्रदेश काँग्रेसकडे त्याबाबत माहिती नाही, असे अशोक चव्हाण म्हणाले. (हेही वाचा, राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष पदावर कायम; पक्षाच्या कार्यकारिणी समितीने फेटाळला राजीनामा; देशभरात प्रादेशिक नेतृत्व बदलाचे संकेत)

काँग्रेस पराभवाचे खापर केवळ राहुल गांधी यांच्यावर फोडता कामा नये. त्यांनी राजीनामा देण्याची काहीच आवश्यकता नाही. मात्र, प्रदेश पातळीवर काँग्रेसमध्ये बरेच बदल करणे गरजेचे आहे. प्रत्येक निर्णय काळजीपूर्वक घेण्याची आवश्यकता आहे, असेही अशोक चव्हाण म्हणाले.