लोकसभा निवडणूकीमध्ये (Lok Sabha Elections) 7 टप्प्यांत मतदान होणार आहे. त्यापैकी 2 टप्पे पार पडले आहेत. दरम्यान या निवडणूकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना सत्ताधारी- विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. अशात संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महायुती वर मोठा आरोप केला आहे. महायुतीचे नेते लोकांना मतदान करण्यासाठी धमकावत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. हा कालचा सोलापूर मधील प्रकार असल्याचे ते म्हणाले आहेत. 'तुमच्याकडे पीएम मोदी असताना, विजयाचा विश्वास असताना असं का करावं लागत आहे?' असा सवाल त्यांनी विचारला आहे.
बारामती मध्ये देखील अजित पवार त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासाठी मतदान करण्यासाठी व्यावसायिक, ट्रेडर्स यांना नोटीसा, धमक्या देत असल्याचा संजय राऊतांचा दावा आहे. व्यावसायिकांनी तसे न केल्यास 50 कोटींचा दंड आकारला जाईल असेही ते म्हणाले आहेत. देशात लोकशाही असताना या सार्याची गरज काय? असाही सवाल त्यांनी विचारला आहे. नक्की वाचा: Lok Sabha Election 2024: 'सुनील तटकरे म्हणजे अजित पवारांची दुसरी बायको'; शेकाप नेते जयंत पाटील यांचा सुनील तटकरेंना खोचक टोला .
संजय राऊत यांची प्रतिक्रिया
#WATCH | Pune, Maharashtra: On INDIA alliance PM candidate, Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut says, "... A coalition government is much better than a democratically elected dictator. Who we choose as our Prime Minister is our wish. We will even make two or four Prime Ministers in a… pic.twitter.com/P3qX0Db6wG
— ANI (@ANI) April 28, 2024
पंतप्रधान मोदींनी काल कोल्हापूरच्या सभेत बोलताना इंडिया आघाडीचा 'दरवर्षी एक पंतप्रधान असेल' या विधानावर संजय राऊत म्हणाले, 'देशात 10 वर्षे हुकूमशहाने राज्य करण्यापेक्षा देशात मिश्र सरकार स्थापन होणे चांगले आहे. दोन पंतप्रधान बनवायचे की चार, हा आमचा निर्णय आहे, पण हा देश हुकूमशाहीकडे जाऊ देणार नाही. निकालामध्ये इंडिया आघाडी 300 च्या पुढे जाईल असेही ते म्हणाले.