Lok Sabha Election 2024: 'सुनील तटकरे म्हणजे अजित पवारांची दुसरी बायको'; शेकाप नेते जयंत पाटील यांचा सुनील तटकरेंना खोचक टोला
Photo Credit - Instagram, Facebook

Lok Sabha Election 2024: नुकतंच मुरुडमध्ये शेकाप(Peasants and Workers Party of India)चा निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्यात जयंत पाटील यांची सुनील तटकरे(Sunil Tatkare) यांच्यावर टीका करताना जीभ घसरली. 'सुनील तटकरे म्हणजे अजित पवारांची ( Ajit Pawar) दुसरी बायको' असल्याचं विधान जयंत पाटील यांनी केलं आहे. पुढे बोलताना त्यांनी, "सुनील तटकरे यांना त्यांचे बंधू अनिल तटकरे यांनी मोठे केलं. पण शेवटी त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला. सुनील तटकरे आता पुन्हा निवडणुकीला उभे राहणार नाहीत अशी स्थिती करायची आहे. अपमानाचा बदला आपल्याला घ्यायचा आहे," असा निर्धार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केला. त्यामुळे आता जयंत पाटील यांच्या या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा:Lok Sabha Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून त्यांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर)

जे पक्ष सोडून गेले आहेत, त्यांची पर्वा न करता शेकापचा लाल बावटा घेऊन सर्वांनी वेगळ्या उमेदीने कामाला लागा असं आवाहन यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. तसंच शेकाप कधीही संपणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान यावेळी त्यांनी सुनील तटकरेंचा उल्लेख अजित पवारांची दुसरी पत्नी असा केला. सुनील तटकरे म्हणजे अजित दादांची दुसरी बायको असं ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवारांनी सुनील तटकरे यांना रायगडमधून उमेदवारी जाहीर केली आहे. सुनील तटकरे हे अजित पवार गटाकडून जाहीर झालेले पहिले उमेदवार आहेत. अद्याप जागावाटप अंतिम झालेलं नसताना अजित पवारांनी सुनील तटकरेंचं नाव जाहीर केलं आहे.