Lok Sabha Election 2024 : राज्यात 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात लोकसभेसाठी मतदान पार पडणार आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. चंद्रपूरमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान(Chandrapur Lok Sabha) होणार आहे. प्रचारादरम्यान उमेदवार कोणत्या गोष्टींचं आश्वासन देतील हे सांगता येत नाही. चंद्रपूरमध्ये तर, चक्क एका महिला उमेदवारांने स्वास्त धान्य दुकानात मतदारांना आनंदाचा शिधासोबत बिअर (Beer), व्हिस्की (whiskey) मोफत देण्याचं म्हटलं आहे. त्यामुळे या महिला उमेदवाराच्या अचंबीत करणाऱ्या आश्वासनामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातल्या पेंढरी येथे राहणाऱ्या वनिता राऊत (Vanita Raut) यांनी हे अनोखं आश्वासन दिलं आहे. (हेही वाचा :Lok Sabha Election 2024: शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपविरोधात तक्रार; निवडणूक आयोगाला लिहिले पत्र, जाणून घ्या कारण )
सामान्यतः उमेदवार विकास कामे करण्याचे आश्वासन देत असतात. मात्र चंद्रपूरातील महिला उमेदवाराने दिलेल्या आश्वासनाने अनेकांना धक्का बसला आहे. अखिल भारतीय मानवता पक्षाच्या वनिता राऊत या चंद्रपूर लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या 15 उमेदवारांमधील एक आहेत. 'आपण खासदार झाल्यास त्यांच्या आश्वासनांच्या यादीत स्वस्त धान्य दुकानातून आनंदाचा शिधासह दारू व बियरची विक्री करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे'. यासोबतच बेरोजगार युवकांना दारूचे परवाने वितरित करण्याबाबतही वनिता राऊत यांनी भाष्य केलं आहे. (हेही वाचा :Lok Sabha Elections 2024 : भाजपकडून स्टार प्रचारकांची पहिली यादी जाहीर; मोदी-शाह गडकरींसह फडणवीस, तावडेही करणार प्रचार )
"मागच्या विधानसभा निवडणुकीत मी चिमूर मतदारसंघातून उभी होती. दारुचा यासाठी घेतला कारण चंद्रपूरात बंदी आहे आणि नागपुरात नाही. चंद्रपूरच्या लोकांनी कोणतं पाप केलं आहे. चंद्रपूरचे लोक कायदेशीर मार्गाने दारु पिऊ शकत नाही आणि नागपुरातील पिऊ शकतात. त्यासाठी मी चंद्रपुरातून दारु बंदी हटवण्याचा विषय मांडला होता. दारुबंदी हटवण्यात आली आहे पण माझे जे काही मुद्दे राहिले होते ते म्हणजे बिअर बार, बेरोजगारांना दारु विक्रीचे परवाने, जे दारिद्र्य रेषेखाली येतात त्यांना रेशन कार्डवर बिअर, व्हिस्की मिळावी. या राहिलेल्या मागण्या मी लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे," असे वनिता राऊत यांनी म्हटलं.
याआधीही वनिता राऊत यांनी अशीच आश्वासने चिमूर विधानसभेची निवडणूक लढवत असताना दिली होती. त्यावेळी मात्र, त्यांची अनामत रक्कम जप्त झाली होती. देशाचे भाग्य ठरवणारी निवडणूक म्हणजे लोकसभा निवडणूक मानली जाते. मात्र वनिता राऊत यांनी दिलेल्या आश्वासनांची चर्चा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात चांगली रंगली आहे.