Parbhani Lockdown: परभणी मध्ये आज रात्रीपासून लॉकडाऊन; सहकार्य करण्याचे नवाब मलिक यांचे नागरिकांना आवाहन

कोविड-19 रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर परभणी मध्येही लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. आज रात्री 12 पासून लॉकडाऊनला सुरुवात होणार असून सोमवार, 15 मार्च सकाळी 6 वाजेपर्यंत हे निर्बंध कायम राहणार आहेत.

Close
Search

महाराष्ट्र Darshana Pawar|
Parbhani Lockdown: परभणी मध्ये आज रात्रीपासून लॉकडाऊन; सहकार्य करण्याचे नवाब मलिक यांचे नागरिकांना आवाहन
Lockdown | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कोविड-19 (Covid-19) रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर परभणी (Parbhani) मध्येही लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आला आहे. आज (12 मार्च) रात्री 12 पासून लॉकडाऊनला सुरुवात होणार असून सोमवार, 15 मार्च सकाळी 6 वाजेपर्यंत हे निर्बंध कायम राहणार आहेत. यामुळे परभणी आणि शेजारील जिल्ह्यांमधील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केले आहे. (Pune Lockdown Latest News: पुण्यात रात्री 11 ते सकळी 6 पर्यंत संचारबंदी, लॉकडाऊन नाही; पाहा कोणते निर्बंध)

राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. रुग्णांची वाढ आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने काही ठिकाणी निर्बंध लागू केले आहेत. पुणे, यवतमाळ, औरंगाबाद, नाशिक अशा विविध शहरांमध्ये लॉकडाऊन, जनता कर्फ्यू, संचारबंदी लागू करण्यात आली आहे. (Nagpur Lockdown: नागपूर शहरामध्ये 15 मार्च ते 21 मार्च दरम्यान कडक लॉकडाऊन)

ANI Tweet:

दरम्यान, दरम्यान राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 22,66,374 झाला असून 52,667 मृतांची नोंद झाली आहे. तर 21,06,400 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. सध्या 1,06,070 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे यात सातत्याने वाढ होत आहे.

कोविड-19 रुग्णवाढीमुळे काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. तसंच कोरोना बाधित रुग्णांची वाढ लक्षात घेता नियमांचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change