Lockdown (Photo Credits: PTI)

नागपूर शहरामध्ये वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर  15 मार्च ते 21 मार्च दरम्यान कडक लॉकडाऊन  लागू करण्यात आला आहे. आज नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी त्याबाबची घोषणा केली आहे. दरम्यान या काळात अत्यावश्यक सेवा सुरू होणार आहे. तसेच राज्यातील कोविड 19 लसीकरणाची मोहिम देखील सुरू ठेवली जाणार आहे. 21 मार्च पर्यंत कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव पाहून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

डॉ. नितीन राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार पुन्हा क्वारंटीन सेंटर सुरू केली जाणार आहेत. त्यामुळे ज्यांना होम क्वारंटीन सेंटरची सोय नाही त्यांनी  या क्वारंटीन सेंटर मध्ये सोय केली जाणार आहे. लॉकडाऊनच्या काळात  शाळा, खाजगी कार्यालयं बंद राहणार आहेत. तर सरकारी कार्यालयामध्ये 25% उपस्थिती राहणार आहे. दूध-भाज्या यांची दुकानं सुरू ठेवली जाणार आहेत. पण नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू  नये असे नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.

लॉकडाउनमध्ये मद्यविक्री दुकान बंद राहतील, मात्र त्यांची ऑनलाइन विक्री सुरु राहणार आहे. तसंच खाद्यपदार्थांची घरपोच सेवा सुरु राहील असं नितीन राऊत यांनी सांगितलं आहे. तर ज्या व्यक्तींना बाहेर पडण्याची मुभा आहे त्यांनी वेळोवेळी आरटीपीसीआर टेस्ट करावी असे देखील आवाहन केले आहे. तसेच 131 केंद्रांवर सुरू असलेल्या लसीकरणाला देखील नागरिकांनी यावं असे सांगण्यात आले आहे.