Pune Lockdown Latest News: पुण्यात रात्री 11 ते सकळी 6 पर्यंत संचारबंदी, लॉकडाऊन नाही; पाहा कोणते निर्बंध
Pune Curfew | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

पुणे (Pune) शहरामध्ये पुन्हा लॉकडाऊन (Pune Lockdown) लागू करण्यात आला नाही. मात्र, रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी ( Pune Curfew) लागू करण्यात आली आहे. ही संचारबंदी 31 मार्च पर्यंत लागू असणार आहे, अशी माहिती पुण्याचे आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. संचारबंदीमध्ये विशेष नवे निर्बंध लागू करण्यात आले नाहीत. आगोदरचेच निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. या निर्बंधानुसार धार्मिक, समाजिक कार्यक्रमांना पोलीस परवानगी आवश्यक आहे. शाळा, महाविद्यालयं ही 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्यात येतील. अत्यावश्यक सेवा आणि या सेवेत येणारी दुकाने नीयमीत सुरु राहतील. पुणे शहरात लॉकडाऊन लावला जाणार नाही. निर्बंध मात्र अतिशय कडक करण्यात येतील असे उपमुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (12 मार्च) सकाळीच स्पष्ट केले होते.

पुणे संचारबंदीदरम्यान असलेले निर्बंध

 

हॉटेल, रेस्टॉरंट्स रात्री 10 वाजेपर्यंत

हॉटेल, रेस्टॉरंट्स रात्री 10 वाजेपर्यंत सुरु राहू शकतात. रात्री 10 ते 11 वाजेपर्यंत होम डिलीव्हरी करण्यास परवानगी आहे. रात्री 10 वाजेपर्यंत ही मुभा असली तरी आसनक्षमतेच्या केवळ 50 टक्के ग्राहकांनाच प्रवेशाची मुभा असणार आहे. (हेही वाचा, Coronavirus: कोरोना व्हायरसच्या विरोधात लढायचे असल्यास मास्क घालण्यासंदर्भात संदेश देणारे Mask Rap महापालिकेकडून प्रदर्शित, पहा व्हिडिओ)

धार्मिक कार्यक्रम

विवाह, अंत्यविधी अथवा इतर कोणतेही धार्मिक कार्यक्रम घ्यायचे असतील तर त्यासाठी पोलिसांची परवानगी आवश्यक आहे. तसेच, या कार्यक्रमामध्ये केवळ 50 लोकच उपस्थित राहतील याची काळजी घेणे आवश्यक आहे. 50 व्यक्तींची मर्यादा ओलांडल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार.

शाळा महावद्यालये

पुण्यातील सर्व शाळा महाविद्यालये 31 मार्च पर्यंत बंद राहणार आहेत. त्यासोबतच शाळा महाविद्यालयांशी संबंधीत कोणतेही कोचिंग, क्लासेस सुरु राहणार नाहीत.

उद्याने, बगिचे

शहरातील सर्व गार्डन, उद्याने, बगिचे हे सायंकाळी बंद राहतील. केवळ मॉर्निंग वॉकला उद्यानांमध्ये प्रवेश असणार आहे. उद्यानांमध्ये कोणत्याही प्रकारच्या क्रीडा अथवा उपक्रमांना बंदी असणार आहे.

कोचिंग क्लासेस

एमपीएससी परीक्षा तोंडावर आहे. त्यामुळे एमपीएससी विद्यार्थी आणि त्यांच्यासाठी असलेल्या कोचिंग क्लासेसना सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. एमपीएससी परिक्षा (21 मार्च) होईपर्यंत संबंधिक कोचिंग क्लासेस सुरु राहतील. मात्र, इथेही 50 % क्षमतेने कोचिंग क्लासेस सुरु ठेवता येणार आहेत.

दरम्यान, पुण्यात पुन्हा लॉकडाऊन लावला जाणार नाही. परंतू, निर्बंध मात्र अतिशय कडक करण्यात येतील असे संकेत पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सकाळीच दिले होते. पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती आज सकाळीच एक आढावा बैठक झाली. या बैठकीस राजकीय नेते आणि आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.