Lockdown: लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्रात एकूण 1 लाख 19 हजार 222 गुन्ह्यांची नोंद; 23 हजार 533 जणांना अटक
Home Minister Anil Deshmukh | (Photo Credits: Facebook Live Screenshot)

महाराष्ट्रात (Maharashtra) दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. तसेच लॉकडाउनच्या (Lockdown) काळात प्रत्येक नागरिकांनी सरकारच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. मात्र, काही ठिकाणी नागरिक लॉकडाउनच्या नियमाचे उल्लंघन आहेत. यामुळे अशा नागरिकांच्या विरोधात महाराष्ट्र पोलिसांकडून (Maharashtra Police) कायदेशीर कारवाई केली जात आहे. दरम्यान, लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्रात आतापर्यंत कलम 188 अंतर्गत एकूण 1 लाख 19 हजार 222 गुन्हे दाखल झाले आहेत. तर, 23 हजार 533 जणांना अटक केली आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दिली आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना घरातच बसून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वारंवार करण्यात येत आहेत. मात्र काही नागरिक अत्यावश्यक साहित्यांची खरेदी करण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. यामुळे सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे उल्लंघन होत आहे. एवढेच नव्हेतर, काही नागरिकांच्या गैरजबाबदारीपणामुळे कोरोना विषाणूचा प्रसार होऊ लागला आहे. लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत कलम 188 अंतर्गत 1 लाख 19 हजार 222 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर, 23 हजार 533 जणांना अटक केली आहे. यात अवैध वाहतूक करणाऱ्याचाही समावेश आहे. तसेच या कालावधीत नागरिकांकडून 5 कोटी 91 लाख 74 हजार 271 दंड वसूल करण्यात आला आहे. हे देखील वाचा- Coronavirus: मुंबईत एकूण 38 हजार 220 जणांना कोरोनाची लागण; गेल्या 24 तासात 1 हजार 510 नव्या रुग्णांची नोंद तर, 54 मृत्यू

अनिल देशमुख यांचे ट्वीट-

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवरही कारवाई केली जात आहे.