कोरोनाच्या (Corona Virus) पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) राज्यातील मंदिरे बंद केली होती. मात्र आता ती उघडण्यास सरकारने परवानगी दिली आहे. वारकरी सांप्रदायासाठी आषाढी आणि कार्तिकी वारी (Aashadhi Kartiki Vari) मोठ् प्रमाणात महत्व असते. दरम्यान आता कोरोनाचा पार्दुभाव काही प्रमाणात कमी झाल्यामुळे सरकारने राज्यातील अनेक निर्बंधात सूट दिली आहे. याप्रमाणेच गेल्या दोन वर्षापासून बंद असलेली कार्तिकी वारीला (kartiki Ekadshi) यावर्षी कोरोनाच्या नियमांचे पालन करून परवानगी मिळण्याची शक्यता आहे. तसेच यावर्षी वारीसाठी योग्य चे उपाययोजना राबवण्यात सरकार प्रयत्न करत आहे.
कार्तिकी वारीसाठी अनेक भक्तमंडळी पंढरपूरात येतात. या दरम्यान पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. ही गर्दी टाळण्यासाठी सरकारने वारी बंद केली होती. तसेच त्या दरम्यान सरकारकडून संचारबंदी लावण्यात आली होती. राज्यात लसीकरणाचा वेग वाढला असून कोरोनाची रुग्णवाढही कमी झाली आहे. हेही वाचा Women's Police Station: महिलांवरील वाढत्या गुन्ह्यांमुळे पिंपरी चिंचवडमध्ये महिला पोलिस स्टेशनची मागणी, प्रस्तावावर आयुक्तांनी 'अशी' दिली प्रतिक्रिया
त्यामुळे यावर्षी 15 नोव्हेंबरला होणारी कार्तिकी वारी कोरोनाचे नियम पाळून व्हावी यासाठी वारकरी संप्रदायाने मागणी केली होती. या मागणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी परवानगी दिली आहे. यासाठी आता प्रशासन प्रयत्नशील आहे. या निर्णयाबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी यावर्षी कार्तिकी वारीसाठी योग्य उपाययोजना करण्यात प्रशासन तयारी करण्यात आल्या आहे.