राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्षांना पत्र; मंत्री, सदस्य यांना शपथ घेण्याबाबत ‘मार्गदर्शक तत्वे’ ठरवून देण्याची केली मागणी
Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari | (Photo Credits: ANI)

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) आणि लोकसभा अध्यक्ष (Speaker Of Lok Sabha) ओम बिर्ला (Om Birla) यांना पत्र लिहलं आहे. या पत्रात त्यांनी मंत्री, सदस्य यांना शपथ घेण्याबाबत ‘मार्गदर्शक तत्त्वे’ ठरवून देण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, नव्याने निवडून आलेले काही संसद सदस्य तसेच विधानमंडळ सदस्य शपथ घेताना निर्धारित प्रारुपातील शपथ घेत नाहीत. शपथ घेताना ते आपल्या पक्षाचे नेते तसेच आराध्य व्यक्तींची नावे जोडून शपथ घेतात. त्यामुळे या संदर्भात सर्व संबंधिताकरिता निश्चित अशी मार्गदर्शक तत्वे आणि आचारसंहिता ठरवून देण्याची विनंती राज्यपालांनी पत्राद्वारे केली आहे. (हेही वाचा - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर इयत्ता 1 ली ते 12 वी चा अभ्यासक्रम 25 टक्के कमी करण्यास राज्य सरकारची मंजुरी)

भगतसिंह कोश्यारी यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना स्वतंत्र पत्र पाठवून राज्यपालांनी शपथ ग्रहण विधीचे पावित्र्य आणि गांभीर्य जतन करण्यासाठी अशा प्रकारच्या मार्गदर्शक तत्वांची गरज असल्याचे नमूद केले आहे. आपल्या आवडत्या पक्ष नेत्यांचे अथवा आपली श्रद्धा व निष्ठा आहे. अशा आराध्य व्यक्तींचे नाव शपथेच्या प्रारूपामध्ये जोडल्यामुळे शपथ विधी प्रक्रियेचे गांभीर्य कमी होते, असंही कोश्यारी यांनी पत्रात म्हटलं आहे.