Varsha Gaikwad (PC - Twitter)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष 2020-21साठी इयत्ता 1 ली ते 12 वी साठी सुमारे 25% पाठ्यक्रम कमी करण्याच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या प्रस्तावास शासन मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भात आज राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी घोषणा केली आहे.

दरम्यान, ऑनलाइन, टीव्ही आणि इतर माध्यमातून आपण 2020-21 हे शैक्षणिक वर्ष सुरु केलं आहे. मात्र, प्रत्यक्षात शाळा अजूनही सुरु झालेल्या नाहीत. अशा परिस्थितीत मुलांच्या मनात तणाव राहू नये, त्यांना दडपण येऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे, असंही वर्षा गायकवाड यांनी यावेळी सांगितलं आहे. (हेही वाचा - शांताबाई पवार यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून 1 लाख रुपयांची मदत; रस्त्यावर पोटासाठी करायच्या कसरत)

शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम 25 टक्के कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कमी केलेल्या अभ्यासक्रमाची यादी संचालक, राज्य शैक्षणिक व संशोधक परिक्षक यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली जाणार असल्यादेखील गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.

गेल्या चार महिन्यांपासून कोरोना विषाणूने देशात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे याचं पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, आता मुलांवर अभ्यासक्रमाचा जास्त ताण येऊ नये, यासाठी 25 टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.