पुण्यात काही दिवसांपूर्वी दर्शना पवारची प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर काही दिवसांतच 27 जूनला पुण्याच्या सदाशिव पेठ भागात एका तरूणीवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न अंगाचा थरकाप उडवणारा होता. दरम्यान या तरूणीला लेशपाल जवळगे या मुलाच्या मदतीने जीवदान मिळाले. लेशपाल जवळगे हा एमपीएससी ची तयारी करणारा तरूण होता. लेशपाल वर कौतुकाचा वर्षाव होत असताना दुसरीकडे त्याला इंस्टाग्राम वर डीएम मध्ये काहींनी तरूणी आणि हल्लेखोराच्या जातीची विचारणा करण्यात आली आहे. यावरूनच लेशपालने लिहलेली इंस्टाग्राम पोस्ट कालपासून चर्चेचा विषय बनली आहे.
लेशपालने पोस्ट मध्ये ‘त्या मुलीची आणि मुलाची जात कुठली होती असं मला मेसेज करून विचारणाऱ्या सडक्या बुद्धीजीवांनो विनंती आहे की ते मेसेज डिलीट करा. ना तुम्ही तुमच्या जातीचे होऊ शकत… नाही समाजाचे… कीड लागली आहे तुमच्या वरच्या थोड्याफार असलेल्या भागाला' असं म्हणत सुनावलं आहे.
View this post on Instagram
27 जूनला एकतर्फी प्रेमामधून सकाळी 10 च्या सुमारास टिळक रस्ता ते पेरूगेट पोलिस चौकी दरम्यान हल्लेखोर शंतनू जाधव 20 वर्षीय तरूणीमागे कोयता घेऊन धावला. जीवाच्या आकांताने मदतीसाठी धावणार्या तरूणीला लेशपालने मदत केली. त्याने हल्लेखोराच्या हातातील कोयता हिसकावून घेतला. 3 सेकंद उशिर झाला असता तर त्या तरूणीने जीव गमावला असता. या घटनेनंतर लेशपालही हादरला होता. तो एका खोली मध्ये तास- दीड तास रडत बसला होता. यानंतर त्याला एका अशा प्रकारचे मेसेज येत असल्याने संताप अनावर झाला आहे. Raj Thackeray: 'डोळसपणे लक्ष ठेवा आणि वेळीच धावून जा', राज ठाकरे यांचे मनसे कार्यकर्त्यांना अवाहन .
लेशपाल हा MPSC स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो पुण्यात राहतो आहे. अभ्यासिकेकडे जात असतानाच हा प्रकार घडला. एमपीएससी परीक्षे व्यतिरिक्त त्याला क्रीडा क्षेत्राची आणि विशेषत: कबड्डी खेळतो.