Raj Thackeray: 'डोळसपणे लक्ष ठेवा आणि वेळीच धावून जा', राज ठाकरे यांचे मनसे कार्यकर्त्यांना अवाहन
पुणे येथे एका तरुणीवर भररस्त्यात कोयत्याने वार झाले. सजक तरुणाने दाखवलेले धाडस आणि प्रसंगावधान यामुळे तरुणीचे प्राण वाचले. या घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या तरुणाचे कौतुक करत त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यांना अवाहन केले आहे.
पुणे येथे एका तरुणीवर भररस्त्यात कोयत्याने वार झाले. सजक तरुणाने दाखवलेले धाडस आणि प्रसंगावधान यामुळे तरुणीचे प्राण वाचले. या घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या तरुणाचे कौतुक करत त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यांना अवाहन केले आहे. ट्विटरच्या माध्यमातून हे अवाहन करताना राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, 'डोळसपणे लक्ष ठेवा आणि वेळीच धावून जा'
राज यांनी पुढे म्हटले आहे की, ''काल पुण्यात एका तरुणीवर हल्ल्याची दुर्दैवी घटना घडली. भररस्त्यात बाकीचे लोकं बघत असताना लेशपाल जवळगे नावाचा तरुण तिथे होता म्हणून ती तरुणी बचावली. लेशपालने जे धाडस दाखवलं त्याबद्दल त्याचं मनापासून कौतुक, पण आसपास इतकी लोकं बघ्याच्या भूमिकेत का गेली किंवा जातात ह्याचं आश्चर्य वाटतं. अर्थात पुढे कशाला चौकशीचा ससेमिरा असा विचार लोकांच्या मनात येत असेलही कदाचित पण ह्यासाठी पोलिसांनी लोकांना आश्वस्त करायला हवं.''
''दर्शना पवारच्या हत्येची दुर्दैवी घटना नुकतीच घडलेली असताना, तसाच काहीसा प्रकार परत घडणं हे गंभीर आहे. सुशोभीकरणातून लोकांचे डोळे पुरेसे दिपलेत, त्यामुळे प्रशासनाकडून कायद्याचा धाक निर्माण होईल हे देखील बघायला सरकारची हरकत नसावी.''
''आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगायला नको की असे प्रकार तुमच्या आसपास घडत नाहीत ना ह्याकडे डोळसपणे लक्ष ठेवा आणि वेळीच धावून जा.''
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 28, 2023 10:40 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

