leopard In Thane (Photo Credits: Twitter)

हायवेच्या रस्त्यांवर, शेतांमध्ये, रहिवाशी इमारतीच्या कम्पाऊंडमध्ये बिबट्या ( Leopard) आढळल्याचे वृत्त अनेकदा आलं आहे. मात्र आज ठाण्याच्या वर्दळीच्या कोरम मॉलमध्ये (Korum Mall) बिबट्या फिरत असल्याचं वृत्त आलं आहे. ठाणे समतानगर परिसरात असलेल्या कोरम मॉलच्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये बिबट्या फिरताना कैद झाला आहे. वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहचले असून बिबट्याचा शोध सुरू आहे.  सुरक्षारक्षकांच्या दाव्यानुसार त्यांनी बिबट्या पाहिला आहे. मात्र याबाबत अजूनही वनविभागाने अधिकृत माहिती दिलेली नाही.

कोरम मॉलवरून बिबट्या सत्कार हॉटेलच्या पार्किंग परिसरामध्ये दिसला आहे. ठाण्याचा समतानगर परिसर हा बराच वर्दळीचा आहे. या भागात रहिवासी वसाहत, रूग्णालय आहेत. मंगळवारी (19 फेब्रुवारी ) च्या रात्री मॉलच्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये बिबट्या कैद झाला आहे. मॉलच्या पार्किंग भागात बिबट्या फिरताना दिसला आहे. बिबट्या मॉलच्या संरक्षक भिंतीवरून पहाटे 5.30 च्या सुमारास बाहेर गेल्याचं निदर्शनास आलं. मॉलच्या सुरक्षा रक्षकांनी हा प्रकार लक्षात येताच बन अधिकार्‍यांना माहिती दिली आहे.  Viral Video : औरंगाबादच्या खुलताबाद घाटात जेव्हा गाडी समोर बिबट्या आला

काही दिवसांपूर्वी नाशिकमध्येही बिबट्याने धूमाकूळ घातला होता. वनविभागाने मोठ्या शितिफीने बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद केलं होतं.