घाटातील रस्त्याच्या कडेला बिबट्या (Leopard )खुलेआम फिरत असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. Youtube वर करण्यात आलेल्या दाव्यानुसार हा व्हिडीओ औरंगाबादच्या खुलताबाद घाट (Aurangabad Khuldabad Ghat) परिसरातील आहे. औरंगाबादच्या खुलताबाद घाटात एक बिबट्या चक्क घाटाच्या कडेला असणाऱ्या कठड्यावर बसल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. काही प्रवाशांनी हा व्हिडीओ शूट केला आहे. चालत्या गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशामध्ये बिबट्याचा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे.
बिबट्याला पाहून गाडीतील प्रवासी खूपच उत्साहीत झाले होते. गाडीतील पुरुषांनी बिबट्याचं चित्रण करता यावं म्हणून ती अधिक पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रवाशांमधील एकानेच ते टाळल्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत आहे. घाटात फारसा प्रकाश नसल्याने मोटारस्वारांना बिबट्या असल्याचा अंदाज नव्हता. जसजसा हेड लाईटचा प्रकाश जवळ येत असल्याचा बिबट्याला अंदाज आला तसा त्याने पुन्हा घाटाच्या जंगलात जाण्यासाठी उडी घेतली.अनेकदा वन्य प्राण्यांना पाहून त्याचे फोटो काढणं, व्हिडीओ बनवणं हे प्रयत्न होतात.लोकांच्या अतिउत्साहाने प्राणी बिथरतात. यामधूनच हल्ल्याची शक्यता असते.
आजकाल मानवी वस्तीमध्ये बिबट्या, वाघ असे प्राणी येण्याचं प्रमाण वाढलं आहे. हे माणसाचं प्राण्याच्या वस्तीत की प्राण्यांच्या वस्तीमध्ये आपलं आक्रमण वाढतंय हा . वाद चर्चेमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी विदर्भात अवनी वाघिणीला बचावात्मक पवित्र्याने मारण्यावरून अनेक चर्चा रंगत आहे. गावकऱ्याचं मत आणि पोस्ट मार्टम रिपोर्ट यामध्ये दोन वेग वेगळ्या गोष्टी समोर आल्याने वाद उभा ठाकला आहे.