मुंबई - नाशिक दरम्यानची रेल्वेसेवा आज ( 26 जुलै) पुन्हा विस्कळीत झाली आहे. सकाळी कसारा घाटात इगतपुरी जवळ दरड कोसळल्याने एक मोठा अपघात होण्याची शक्यता होती मात्र चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानतेमुळे अनेक प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. सध्या नाशिकमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असल्याने अनेक ठिकाणी धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. अशातच आज देवगिरी एक्सप्रेसजवळ (Devagiri Express) झालेल्या अपघातामुळे रेल्वेची सुरक्षा पुन्हा धोक्यात आली आहे. नाशिक -मुंबई दरम्यान रेल्वे ट्रॅकवर ही दुर्घटनेची तिसरी घटना आहे.
आज सकाळी साडे चारच्या सुमारास देवगिरी एक्सप्रेससमोर नाशिक कडून मुंबईच्या दिशेने जात होती. चालकाने तिसर्या बोगदयाजवळ लांबूनच दरड कोसळल्याचा धोका ओळखून ट्रेन थांबवली. त्यानंतर ट्रॅकवर दरड हटवण्याचं काम सुरू करण्यात आलं. दरम्यान तीन तास नाशिक मुंबई वाहतूक ठप्प होती. आता दरड हटवल्यानंतर धीम्या गतीने ही वाहतूक सुरू करण्यात आली आहे. सध्या या मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. नाशिक: इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा; राज्यराणी, पंचवटी एक्सप्रेस चं वेळापत्रक कोलमडलं
नाशिक मुंबई रेल्वे मार्गावर काही दिवसांपूर्वी रेल्वे रूळाला तडे गेले होते. तर आठ्वड्याभरापूर्वी अंत्योदय एक्सप्रेसला अपघात झाला होता. या ट्रेनचा एक डबा घसरला होता.