Lalbaug Cylinder Blast Update: मुंबईतील लालबाग मधील साराभाई इमारतीत 6 डिसेंबरला सिलेंडरचा सकाळच्या वेळेस स्फोट झाल्याची घटना घडली होती. यामध्ये एकूण 16 जण होरपळून जखमी झाले होते. जखमींना केईएम आणि मसीना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तर आता ताज्या अपडेट्सनुसार, या प्रकरणी आता मृतांचा आकडा 10 वर पोहचल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.(Lalbaug Gas Explosion Update: मुंबई येथील लालबाग परिसरात सिलिंडर स्फोटात जखमी झालेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू)
सिलेंडरच्या स्फोटात जखमी झालेल्या 16 पैकी 10 जण केईएम रुग्णालत तर 6 जणांना मसीना येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तर 26 डिसेंबर पर्यंत मृतांचा आकडा हा 9 वर गेला होता. मात्र आज एकूण 10 जणांचा मृत्यू झाला आहे.(Cylinder Blast in Lalbaug: लालबाग येथे सिलेंडरच्या स्फोट, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल)
Tweet:
Death toll rises to 10 in the cylinder blast incident of December 6 in Lalbaug area of Mumbai. 16 people were injured in the incident: Brihanmumbai Municipal Corporation (BMC)
— ANI (@ANI) December 28, 2020
दरम्यान, ज्या घरात स्फोट झाला तेथे लग्न सोहळा पार पडणार होता. तर हळद समारंभ सुरु असताना गॅस गळतीचा वास येऊ लागला असता तो कोठून येतो त्याचा तपास केला. त्यावेळी एका बंद खोलीतून गॅस लीक झाल्याचा वास येत असल्याचे कळताच त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. तेव्हाच सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटानंतर अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच जखमींना पाहण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या केईएम रुग्णालयात ही दाखल झाल्या होत्या.