Cylinder Blast in Lalbaug: लालबाग येथे सिलेंडरच्या स्फोटात 20 जण जखमी, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
Fire | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

Cylinder Blast in Lalbaug: मुंबईतील लालबाग मधील साराभाई इमारतीच्या एका बंद खोलीत गॅस स्फोट झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये 20 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळच्या वेळेस ही घटना घडली असून अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि मोठे दोन टँकर्स ही घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.(मुंबई: मालाड च्या त्रिवेणी नगर परिसरात भीषण आग, अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल)

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून या खोलीतून गॅस लीक असल्याचा वास येत होता. त्यामुळे गॅस लीकचा वास कुठून येत असल्याचे पाहण्यासाठी स्थानिक गेले असता त्याचा अचनाक स्फोट झाला. यामध्ये 20 जण जमखी झाल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच घटनास्थळी पोलीस ही दाखल झाले असून पुढील तपास केला जात आहे.(Mumbai: धक्कादायक! धारावीत 5 वर्षीय मुलाचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू)

 Tweet:

दरम्यान, काल मध्यरात्री सुद्धा ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा मधील दोस्ती कॉम्प्लेक्समध्ये असणाऱ्या एका दुकानाला आग लागल्याची घटना घडली होती. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या होत्या. या प्रकरणी कोणतीच जिवीतहानी किंवा दुखापत झालेली नसल्याचे सांगण्यात आले आहे.