Mumbai: धक्कादायक! धारावीत 5 वर्षीय मुलाचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू
Lift accident (Photo Credits-ANI)

मुंबईतील धारावी (Dharavi) मध्ये एका 5 वर्षीय मुलाचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी तपास केला असता सीटीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून आले की, हुजैफा शेख हा लिफ्टला असलेल्या जाळीत अडकला असून बाहेरील दरवाजा बंदच होता. त्यानंतर लिफ्ट वरती जाऊ लागल्याचे दिसून आले. यामुळे मुलाच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. धारावीतील क्रॉस रोड मधील कोझी शेल्टर इमारतीत ही घटना घडली आहे.(Amravati Murder: मुलगी आणि जावयाचे भांडण मिटवणे सासूच्या जीवावर बेतले; अमरावती येथील धक्कादायक घटना)

शेख हा तळमजल्यावरुन सुमारे 12.45 वाजता त्याच्या दोन बहिणींसोबत लिफ्टमध्ये चढला. एक बहिण सात वर्षाची तर दुसरी तीन वर्षाची आहे. मात्र जेव्हा लिफ्ट चौथ्या मजल्यावर पोहचली तेव्हा त्या दोघी निघून गेल्या पण शेख हा बाहेर आलाच नाही. मृत्यू झालेल्या मुलाचे वडील हे गार्मेंट्स मध्ये काम करतात तर आई गृहीणी आहे. या घटनेमुळे नागरिकांनी त्यांच्या मुलांना लिफ्टमधून एकटे जाण्यास देऊ नये असे पोलिसांनी आवाहन केले आहे.(Mumbai: लॉकडाऊन दरम्यान राहिल्या आलेल्या 17 वर्षीय मुलीवर नातेवाईकाकडून बलात्कार; आरोपी अटकेत)

रिपोर्टनुसार, अपघाताच्या अर्ध्या तासानंतर शेख याच्या आईने त्याचा शोध घेतला असता त्यांना लिफ्टच्या येथे रक्त सांडलेले दिसून आले. सीसीटीव्ही फुटेज नुसार, सहाव्या मजल्यावरचे बटण लाल रंगाचे होते. म्हणजेच सहाव्या मजल्यावर कोणीतरी लिफ्ट बोलावली होती.