Amravati Murder: मुलगी आणि जावयाचे भांडण मिटवणे सासूच्या जीवावर बेतले; अमरावती येथील धक्कादायक घटना
Image used for representational purpose

मुलगी आणी जावयाच्या भांडणात मिटवण्यासाठी मध्यस्थी गेलेल्या सासूची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना अमरावतीमधील (Amravati) दसरा मैदान रोड स्थित वसंतराव नाईकनगर नं. 2 येथे शुक्रवारी (27 नोव्हेंबर) रात्री 10.30 च्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात जावयाच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात असून त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच राजापेठ पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. या घटनेने अमरावती जिल्ह्यात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

अमित किशोर सडमाके असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. त्याची सासू कलावती या वसंतराव नाईकनगर नं. 2 येथे भाड्याने राहत होत्या. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी दिपाली आणि जावई अमित हे देखील राहत होते. अमित हा दिपालीच्या चचारित्र्यावर संशय करायचा. यामुळे त्यांच्यात सतत वाद होत असे. दरम्यान, 27 नोव्हेंबर रोजी यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यावेळी सासू कलावती यांनी मध्यस्थी करून दोघांमधील भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतापलेल्या अमितने चक्क कलावती यांना पाईपानेच मारहाण करण्यास सुरुवात केली आहे. ज्यात त्या गंभीररित्या जखमी झाल्या. त्यानंतर दिपालीने त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, आज पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हे देखील वाचा- Girl Harassed on Mumbai Local Train: धक्कादायक! तरुणीचा विनयभंग करून धावत्या लोकलमधून बाहेर फेकण्याचा प्रयत्न; एकाला अटक

या घटनेची माहिती होताच राजापेठ पोलिसांनी घटनास्थळ धाव घेऊन चौकशी केली. त्यानंतर आरोपी अमित याच्याविरोधीत भारतीय दंड विधायक कलम 307 अन्वये गुन्हा नोंदवला आहे, अशी माहिती लोकमतने आपल्या वृत्तात दिली आहे. या घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरात एकच खळबळ निर्माण झाली आहे.