Krishna Janmashtami 2020 Celebrations: मुंबई मध्ये श्री कृष्ण जन्मोत्सव पूजा लाईव्ह स्ट्रिमिंगच्या द्वारा भाविकांसाठी खुली असेल; कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर निर्णय
जन्माष्टमी । File Photo

भारतामध्ये सध्या कोरोना व्हायरसचं संकट घोंघावत असल्याने आता त्याचा परिणाम सण आणि उत्सवांच्या सेलिब्रेशनवर होणार आहे. यंदा 11 ते 13 ऑगस्ट दरम्यान श्रीकृष्ण जन्मोत्सव म्हणजेच गोकुळाष्टमी आणि गोपाळकाला साजरा केला जाणार आहे. यंदा महाराष्ट्रामध्ये मंदिरं बंद असल्याने 2 दिवसांचा उत्सव 3 दिवस होणार असून भाविकांना ऑनलाईन दर्शन खुले केले जाईल अशी माहिती टाईम्स ऑफ ईंडियाच्या वृत्तामधून देण्यात आली आहे.

मुंबईमध्ये इस्कॉन मंदिरात 12 ऑगस्टच्या मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा होणार आहे. त्यासाठी भाविकांना ऑनलाईन दर्शन खुलं असेल. ई पूजा आनि अभिषेक देखील ऑनलाईन होणार आहे. इस्कॉन मंदिराच्या पूजा विधी, त्याच्या महत्त्वाच्या वेळा फेसबूक पेज सह ऑफिशिएल सोशल मीडीया हॅन्डलवर अपडेट केली जाणार आहेत. https://www.facebook.com/iskconjuhu/posts/10164363540015508 हे जुहू येथील इस्कॉन मंदिराचेअधिकृत फेसबूक पेज आहे.

श्री कृष्ण जन्मोत्सवानंतर दहीहंडी फोडून गोपाळकाला साजरा केला जातो. दरम्यान अनेक भाविक कृष्ण जन्मोत्सवाच्या दिवशी उपवास ठेवतात. रात्री 12 वाजता कृष्ण जन्म साजरा करतात. भारतामध्ये प्रामुख्याने मथुरा, वृंदावन, द्वारका येथे कृष्ण जन्म मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो.मात्र यंदा कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर तेथेही नियमावली जारी करत भाविकांवर मंदिर प्रवेशाबद्दल नियमावली जारी करण्यात आली आहे.

भारतामध्ये यंदा 11 ऑगस्टच्या मध्यरात्री 12 वाजून 21 मिनिटांपासून 1 वाजून 06 मिनिटांपर्यंत या वेळेत कृष्णजन्म साजरा होईल. तर 12 ऑगस्टला दहीहंडी, गोपाळकाला साजरा केला जाणार आहे. मात्र यंदा मुंबईमध्ये दरवर्षी रंगणारा दहीहंडीचा थरारक खेळ रंगणार नाही. अनेक आयोजकांनी दहीहंडी रद्द केली आहे.