Konkan Refinery: कोकणातील रिफायनरी बारसू सोलगावात होणार, केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांकडून हिरवा कंदिल

कोकणातील रिफायनरी (Konkan Refinery) हा गेले कित्येक वर्षापासून वादग्रस्त विषय आहे. पण हा वाद लवकरचं मिटणार असुन रिफायनरीच्या कामाचा लवकरचं श्रीगणेशा होणार अशी शक्यता आहे. कोकाणातील (Konkan) रिफायनरी आधी नाणार (Nanar) मध्ये होणार होती. पण कोकणातील नैसर्गिक सौदर्य, जैवविविधतेचा विचार करत नाणार गावकऱ्यांसह विविध राजकीय पक्षांनी या रिफायनरीस विरोध दर्शवला होता. त्यानंतर नाणार मधील रिफायनरी रद्द करण्यात आली. तरी आता नाणार (Nanar Refinery) येथील रिफायनरी रद्द झाल्यानंतर राजापूर (Rajapur) तालुक्यातीलच बारसू (Barsu) आणि सोलगाव (Solgaon) इथं रिफायनरी प्रस्तावित आहे. बारसू आणि सोलगावला केंद्रीय पेट्रोलियम मंत्री (Petroleum Minister) हरदीप सिंह पुरी (Hardeep Singh Puri) यांनी हिरवा कंदील दाखवला आहे.

 

कोकणातील रिफायनरी (Konkan Refinery) तसेच बारसू सोलगावबाबत उदय सामंत (Uday Saman)t आणि हरदीप सिंह पुरी (Hardeep Singh Puri) यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. तरी बारसू (Barsu)  आणि सोलगावातील Solgaon) गावकऱ्यांचं याबाबत काय मत आहे हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. कारण नाणार प्रमाणेचं या गावातील नागरिकांनी देखील जर विरोध दर्शवला तर या रिफायनरीवर (Refinery) मोठं प्रश्न चिन्ह निर्माण होवू शकतं. तरी उदय सामंत राज्याचे उद्योक मंत्री झाल्यानंतर कोकणातील उद्योगांना अधिक चालना मिळेल अशी चर्चा आहे. (हे ही वाचा:- Gujrat मधून Sanjay Gandhi National Park मध्ये 2 सिंह आणणार, महाराष्ट्र वन विभागाची माहिती)

 

नुकताच वेदांचा प्रकल्प (Vedanta Semiconductor Project) गुजरातमध्ये (Gujarat) पळवला गेला यांवरुन शिवसेना (Shiv Sena) ,राष्ट्रवादी (NCP) आणि कॉंग्रेसकडून (Congress) शिंदे फडणवीस सरकारवर मोठी टीका झाली. उद्योगांची मोठ्या संधीला महाराष्ट्र (Maharashtra) मुकला असा हल्लाबोल विरोधकांकडून करण्यात आला. तरी आता कोकणातील रिफायनरी हा वेदांताचा डॅमेज कंट्रोल (Damage Control) वापरण्यात येत आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी आणि उदय सामंत यांच्या भेटीनंतर कोकणातील रिफायनरी प्रोजेक्टला वेग आला आहे.