Konkan Railway Christmas/New Year Special Trains: ख्रिस्मस आणि नववर्षाच्या सेलिब्रेशन साठी कोकण रेल्वेमार्गावर चालवल्या जाणार 5 विशेष ट्रेन्स; पहा संपूर्ण यादी
Konkan Railway | Image used for representational purpose | (फोटो सौजन्य-फेसबुक)

येत्या 19 दिवसांमध्ये आपण साल 2019 ला अलविदा म्हणत नववर्षाचं म्हणजे 2020 चं स्वागत करणार आहोत. नववर्ष सेलिब्रेट करण्यासाठी अनेकांचे वेगावेगळे प्लॅन्स बनायला सुरूवात झाली आहे. गोवा आणि कोकणामध्ये निसर्गाच्या सानिध्यात, निळ्याशार समुद्र किनारी मोठ्या जल्लोषात नववर्षाचं स्वागत करण्यासाठी तरूणाईची झुंबड उडते. मग यंदा तुमचा कोकणात किंवा गोव्यात जाण्याचा प्लॅन अगदीच आयत्यावेळेस झाला असेल तर तिकीट बुकिंगची चिंता नको! कारण कोकण रेल्वेकडून नववर्ष आणि ख्रिस्मस या दोन्ही सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर 5 विशेष ट्रेन्स चालवल्या जाणार आहेत. यामध्ये मुंबई आणि पुणे येथून करमाळी,सावंतवाडी, थिविम स्टेशन पर्यंत धावणार्‍या खास ट्रेन्स सोडण्यात आल्या आहेत.

कोकण रेल्वे चालवणार मुंबई, पुणे ते गोव्यादरम्यान या विशेष गाड्या

  • 01037 एलटीटी-सावंतवाडी ट्रेन 23,30 डिसेंबर आणि 6 जानेवारी रोजी रात्री 1.10 वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी 12.30 वाजता सावंतवाडीला पोहोचणार आहे.
  • 01079 एलटीटी-कोच्चुवेल्ली ट्रेन 21,28 डिसेंबर आणि 4 जानेवारी रोजी रात्री 12.45 वाजता निघुन दुसर्‍या दिवशी सकाळी 9.05 वाजता कोच्चुवेल्लीला पोहोचणार आहे.
  • एलटीटी-करमाळी ट्रेन 18,25 डिसेंबर आणि 1,8 जानेवारी रोजी रात्री 12.45 वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी 12.30 वाजता आहे.
  • 014467-01468 पुणे-एर्नाकुलम-पुणे हमसफर एक्सप्रेस चालविण्यात येणार आहे.
  • 01014-01013 ही करमाळी- पनवेल-थिविम अशी विकली स्पेशल ट्रेन चालवली जाणार आहे.

कोकण रेल्वे ट्वीट

दरम्यान कोकणात आणि गोव्यात जाण्यासाठी रेल्वेचं तिकीट खूप कमी वेळातच हाऊसफुल्ल होतात. दरम्यान सामान्य बुकिंग ही 4महिने आधीच बुक केली जातात त्यामुळे अनेकांना तिकीटं मिळत नाहीत ही ओरड असते. पण आता अशा प्रवाशांसाठी या विशेष ट्रेन्स फायद्याच्या ठरणार आहेत. सोबतच आता गोव्याहून मुंबईत येण्यासाठी खास क्रुझ सेवा देखील सुरू करण्यात आली आहे.