Representational Image | (Photo Credits: IANS)

कोकण रेल्वे मार्गावर (Konkan Railway) खेड मध्ये आज (20 डिसेंबर) खेड (Khed)  ते दिवाणखवटी (Diwankhavti)  स्टेशन दरम्यान रेल्वेची मेंटनन्स व्हॅन पटरीवरून घसरल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज सकाळी  7  च्या सुमारास हा अपघात झाल्यानंतर दोन्ही मार्गावरील वाहतूक सध्या विस्कळीत झाली आहे. या मार्गावर धावणार्‍या आजच्या गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आले आहेत. सध्या दोन्ही मार्गावरील गाड्या अनेक स्टेशन मध्ये थांबवण्यात आल्या होत्या पण हळूहळू त्या पुढे सोडल्या जात आहेत.

रेल्वे कडून देण्यात आलेली माहिती

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी करमाळी-मुंबई सीएसएमटी तेजस सुपरफास्ट एक्सप्रेस 2 वाजून 40 मिनिटांनी सुटण्याऐवजी 4 तास उशिरा म्हणजे संध्याकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी सुटणार आहे. तर सकाळपासून थांबवलेल्या 5-6 विविध एक्सप्रेस गाड्या पुढे आता नियमित करण्यात आल्या आहेत.

दरम्यान कोरोना संकटानंतर सध्या कोकण मार्गावर ठराविक ट्रेन सोडल्या जात आहेत. कोविड 19 च्या प्रोटोकॉलची अंमलबजावणी करून प्रवाशांची ये-जा सुरू आहे. सध्या नाताळ आणि न्यू इयर सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर कोकण, गोवा मध्ये जाणार्‍या प्रवाशांची संख्या वाढली आहे.