Election | (Photo credit: archived, edited, symbolic images)

कोल्हापूर (Kolhapur) उत्तर विधानसभा मतदारसंघात लागलेल्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. या मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट सामना पाहायला मिळतो आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राज्याचे मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्याकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी एकूण 2 हजार 142 कर्मचारी नियुक्त करण्यता आले आहेत. तर मतरारांच्या सेवेसाठी 357 ईव्हीएम मशीन (EVM Machine) द्वारे ही प्रक्रिया पार पडत आहे. पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, अटीतटीचा सामना असल्याने या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेस पक्षाच्या जयश्री पाटील या महाविकासआघाडीचा (Maha Vikas Aghadi) उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. भाजप नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दुसऱ्या बाजूला भाजपने सत्यजित कदम यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे भाजपने प्रतिष्ठा पणाला लावली आहे. दोन्ही पक्षांचे राज्यातील वरिष्ठ नेते प्रचारासाठी कोल्हापूरात दाखल झाले होते. त्यामुळे निकाल काय लागतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

रविवार हा या निवडणुकीतील प्रचाराचा शेवटचा दिवस ठरला. त्यानिमीत्त राजकीय नेत्यांच्या जोरदार सभा रंगल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कोल्हापूरातील महाविकासआघाडीच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. या वेळी बोलतान कोल्हापूर हा भगव्याचाच बालेकिल्ला असल्याचे ठासून सांगितले. इतकेच नव्हे तर, या ठिकाणी महाविकासआघाडीच्या जयश्री जाधव याच निवडून येतील असा विश्वासही बोलून दाखवला. विरोधकांच्या टीकेला फार लक्ष देण्याची गरज नाही. खोट बोल पण रेटून बोल ही त्यांची वृत्तीच बनली आहे. भाजपला सोडलं म्हणजे हिंदुत्त्व सोडले असे नव्हे. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले.