Kolhapur News: बाजारातून महिलेचे केले अपहरण, दोघांविरुधात गुन्हा दाखल, कोल्हापूरातील घटना
Representational Picture (photo credit- File image)

Kolhapur News: पती सोबत बाजारात आलेल्या पत्नीचे अपहरण झाल्याची खळबळजनक घटना कोल्हापूरात घडली आहे. कोल्हापूरातील गडहिंग्लज शहरात ही घटना घडली आहे.नगरपरिषदेच्या समोरील रोडवर रविवारी पहाटे पावणे सहाच्या सुमारास हे अपहरण झाल्याचे पोलीसांनी सांगितले. भाजीपाला व्यववसाय करणारे पती लक्ष्मण नवलगुंदे यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली. पोलीसांनी दोन अज्ञातांविरुधात गुन्हा दाखल करून घेतला आहे.लता लक्ष्मण नवलगुंदे असे अपहरण झालेल्या महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार. रविवारी गडहिंग्लजमध्ये आठवडी बाजारासाठी ते पहाटेच घरातून निघाले. त्यांच्यासोबत आणखी एक नातेवाईक महिला होती. पती पत्नी दोघेही भाजी विक्रीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी बसले होते. पत्नी होळकर चौकात भाजीपाल विकत असताना, लता जवळ तोंड बांधून अज्ञात लोक आले. तीला बळजबरीने ओमनी गाडीत घालून फरार झाले.

महिलेला आरडओरड ऐकून नातेवाईक महिला धाव घटनास्थळी गेली. त्यावेळी लताला घेवून फरार होताना तीला दिसले. हा सर्व प्रकार लताच्या पतीला महिलेने सांगितले. त्यांनी पटकन गाडीचा पाठलाग करण्याचा प्रतत्न केला. पंरतु ते हाती आले नाही, लताच्या पतीने पोलीस ठाण्यात धाव घेतला, पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून त्यांच्या तपास सुरु केला.