शिवरायांची 'जगदंबा तलवार' परत मिळवण्याच्या मागणीसाठी 'शिवदुर्ग संवर्धन आंदोलन' संघटनेचा पुढाकार; भारत-इंग्लंड सामन्यांना गनिमी काव्याने विरोधाच्या तयारीत
Shivdurg Samvardhan-Andolan | Phot Credits: File Photo

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची 'जगदंबा तलवार' (Jagdamba Talwar) सध्या इंग्लंडच्या राणीच्या व्यक्तिगत संग्रहामध्ये आहे. महाराजांची ही तलवार परत मिळावी या मागणी साठी आता जोर धरु लागला आहे. कोल्हापूर मधील शिवप्रेमी संघटना सध्या सुरू असलेल्या इंग्लंड भारत क्रिकेट सामन्यांना विरोध करणार असल्याची माहिती शिवदुर्ग संवर्धन आंदोलन यांच्याकडून देण्यात आली आहे.

महाराष्ट्र टाईम्सच्या वृत्तानुसार, छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंबा तलवार कोल्हापूर छत्रपतींच्या गादीवर छत्रपती चौथे असताना इंग्रजांना भेट देण्यात आली होती. 1975 साली भारत भेटीवर असताना तत्कालीन प्रिन्स ऑफ वेल्स यांना भेट म्हणून ही तलवार दिल्याचं हर्षल सुर्वे सांगतात. दरम्यान ही तलवार महाराष्ट्रात परत यावी म्हणून मागील काही वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. लोकमान्य टिळक यांच्यापासून यशवंत चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री ए आर अंतुले यांनी पाठलाग केला होता. 6 वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील तलवार परत आणण्याची घोषणा केली होती मात्र अद्याप त्याच्यापुढे या दृष्टीने कोणतीही हालचाल झाल्याचे पहायला मिळालेले नाही. IND vs ENG 3rd Test: तिसऱ्या टेस्ट मॅचपूर्वी विराट कोहलीची इंग्लंडला चेतावणी, म्हणाला- 'इंग्लंडमध्येही कमकुवतपणा, आमचे गोलंदाज भारी पडतील'.

इंग्लंडच्या रॉयल कलेक्शन ट्रस्टमध्ये सध्या जगदंबा तलवार आहे. ही तलवार परत मिळवण्यासाठी पुन्हा हालचालींना वेग आला आहे. भारत- इंग्लंड सामन्यांना विरोध नाही. पण पुण्यामध्ये येत्या काही दिवसांत सामने होणार आहेत. या सामन्यांमध्ये गनिमी काव्याने विरोध केला जाईल. त्यामागील उद्देश हाच आहे की या प्रकरणाची इंग्लंडच्या राणीने दखल घ्यावी. अशा विरोधामुळे त्यांच्यापर्यंत शिवप्रेमींच्या भावना पोहचतील. असा विश्वास देखील या संघटनेकडून वर्तवण्यात आला आहे.

मार्च महिन्यात 23,26,28 दिवशी पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड संंघामध्ये एकदिवसीय सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान या मॅचेसने भारत दौर्‍यावर आलेल्या इंग्लंड संघाच्या या दौर्‍याची सांगता होणार आहे. कदाचित 28 मार्चचा सामना मुंबईला होण्याची शक्यता आहे. अदयाप याबाबत अंंतिम निर्णय झालेला नाही.