Sanjay Raut On Kirit Somaiya: किरीट सोमय्या अँड फॅमिलीचा विक्रांत नंतर आता 'टॅायलेट घोटाळा' बाहेर काढणार; संजय राऊत यांचा इशारा
Sanjay Raut, Kirit Somaiya | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Sanjay Raut On Kirit Somaiya: शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी किरीट सोमय्या अँड फॅमिलीचा विक्रांत नंतर आता 'टॅायलेट घोटाळा' (Toilet Scam) बाहेर काढणार असल्याचा सूचक इशारा दिला आहे. संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात पोस्ट केली आहे. यात त्यांनी थेट किरीट सौमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांच्या कुटुंबाचा उल्लेख करत टॉयलेट घोटाळा बाहेर काढणार असल्याचं म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, किरीट सोमय्या यांच्यावर जवळपास 100 च्या आसपास घोटाळे असतील. यावेळी संजय राऊत यांनी सत्र न्यायालयाने जे प्रश्न विचारले आहेत त्यांचे काय झाले? असे म्हणत विक्रांतसाठीच्या गोळा केलेल्या पैशाबाबत प्रश्न उपस्थित केला. (हेही वाचा - Gunratna Sadavarte यांना दिलासा नाहीच; सातारा न्यायालयाने वाढवली 4 दिवसांची पोलिस कोठडी)

यावेळी भाजपवर निशाणा साधताना संजय राऊत म्हणाले, वैफल्यातून भाजपचे महाविकास आघाडीवर आरोप सुरु आहेत. किरीट सोमय्यांना उच्च न्यायालयाने दिलेल्या अटकपूर्व जामिनावर बोलताना राऊत यांनी न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टीला छिद्र पडलंय का? असा सवाल केला.

दरम्यान, यापूर्वी संजय राऊत यांनी ट्विट करून 'आणखी एक दिलासा घोटाळा' असं म्हटलं होतं. राऊत यांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चांगलीचं चर्चा रंगली होती. आज संजय राऊत यांनी पुन्हा आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून किरीट सोमय्या यांच्या टॉयलेट घोटाळ्याचा उल्लेख केला आहे. राऊत यांनी आपण लवकरचं सोमय्या कुटुंबाचा टॉयलेट घोटाळा बाहेर काढणार असून यामध्ये 100 कोटींहून अधिकचा अपहार झाल्याचा आरोप केला आहे.

आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, 'आता मी या महाशयांचा एक टॉयलेट घोटाळा काढणार आहे. मीरा भाईंदर महानगरपालिका आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी काही कोटींचा टॉयलेट घोटाळा झाला आहे. म्हणजे कुठे कुठे पैसे खातात पाहा, विक्रांतपासून ते टॉयलेटपर्यंत,' असं सूचक वक्तव्य करत संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांना इशारा दिला आहे.