Gunaratna Sadavarte | (File Image)

सातारा पोलिसांनी (Satara Police) छत्रपतींच्या वंशजांबद्दल आक्षेपार्ह विधानं केल्याने काल अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना पोलिस ताब्यात घेतलं होते. आज कोर्टात दाखल केल्यानंतर सातारा सत्र न्यायालयाने त्यांना 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान मुंबईत शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी अचानक एसटी कर्मचार्‍यांचा एक गट आंदोलनासाठी आल्या प्रकरणी सदावर्ते  यांना अटक झाली होती.

मीडीयाशी बोलताना खासदार उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने ते गोत्यात आले होते. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दोन वर्षांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यांच्या तपासाबाबत नोटिसा पाठवूनही ते हजर नव्हते परिणामी आता मुंबईत अटकेत असताना सातारा पोलिसांनी त्यांचा ताबा घेतला आहे. हे देखील नक्की वाचा: Silver Oak Attack: गुणरत्न सदावर्ते यांचा सहकारी संदीप गोडबोले यास दोन दिवसांची पोलीस कोठडी, सिल्वर ओक हल्ला प्रकरण .

आज कोर्टात वंश भेद, जातीय तेढ निर्माण करण्याचा आणि समाजात कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न सदावर्ते यांच्या कडून होत आहे असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला. तर सदावर्ते प्रतिष्ठित वकिल आहेत. पोलिसांनी दिलेल्या नोटीसीला दिनांक नसल्याने सातारा पोलिसांनी केलेली अटक कायदेशीर प्रक्रियेला अनुसरून नाही असे त्यांचे मत होते.

आज सकाळी कोर्टात जाताना सदावर्ते यांनी घोषणाबाजी केली. सातरा मध्ये सचिन थोरात, सतिश सूर्यवंशी आणि प्रदीप डोरे हे त्यांची बाजू मांडत आहेत.