Kalyan News: रेल्वे स्टेशनहून चार वर्षाच्या मुलाचं अपहरण, कल्याण पोलीसांनी आठ तासांतच मुलाचा घेतला शोध
Representational Picture (photo credit- File image)

Kalyan News: कल्याण रेल्वे स्थानकावरून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अवघ्या चार वर्षांचा मुलाच अपहरण केल्याचं उघडकीस आले आहे. कल्याण गुन्हे शाखा पोलीसांनी आठ तासांच मुलाचा शोध घेतला आणि मुलाला आई- वडिलांच्या स्वाधीन केलं. या घटने संदर्भात मुलाचे अपहरण झाल्याचे पोलीसांनी सांगितले. या प्रकरणात कचरू वाघमारे याला अटक केलं. कचरूला मुलगा हवा असल्याने त्याने मुलाचे अपहरण केल्याचे तपासणीत आले.

कल्याण रेल्वे स्टेशनच्या वेटिंग रुममध्ये करण गुप्ता आणि त्यांची पत्नी शुभांगी गुप्ता हे दोघे दोन मुलांसह आले होतं. हे दोघे मजूरांच काम करतात. सकाळी कपडे धुण्यासाठी वेटींग रुममध्ये आले. त्याच्या कडे साबण नसल्यामुळे दोघे जण रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडले. वेटींग रुममध्ये उपस्थित एक जोडपं  आणि त्याच्या चार मुली तिथे खेळत होते. त्यांना आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्यास सांगून करण आपल्या पत्नीसह साबण आणण्यासाठी गेला. साबण घेऊन परतल्यानंतर त्यांना धक्काच बसला. त्यांच्या मुलगा अथर्व आणि त्यांच्यासोबत खेळत असलेले चारही मुली तिथे नव्हत्या. करण आणि शुभांगीने आजूबाजूला आपल्या मुलाचा शोध घेतला मात्र मुलगा सापडला नाही.

शेवटी त्याने कल्याण रेल्वे गुन्हे पोलीस ठाण्यात धाव घेतला. कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने तत्काळ या मुलाचा शोध सुरू केला. पोलीसांनी स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही तपासले. सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास  एक व्यक्ती अथर्वला घेऊन कल्याण रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर आढळून आला. हा व्यक्ती नाशिकला जाणारी ट्रेन पकडणार होता तेवढ्यात पोलीसांनी अटक केले. मुलाची सुटका केली.तपासणी दरम्यान समोर आले की, कचरू वाघमारेला चार मुली होत्या. त्याला मुलगा हवा होता. मुलाच्या हव्यासापोटी त्याने चार वर्षाच्या चिमुकल्याचं अपहरण केल्याचं समोर आलं आहे.