Unwell Kid | Photo Credits: pixabay.com

जगभरात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत असताना आता लहान मुलांमध्ये या आजारासोबतच कावासाकी (Kawasaki)ची देखील दहशत आहे. प्रामुख्याने अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये लहान मुलांमध्ये कावासाकी च्या काही केसेस लहान मुलांमध्ये दिसल्या. आता भारतात आणि मुंबईमध्येही कावासाकी सदृश्य काही लक्षणं आणि केसेज समोर येत असल्याने मुंबई शहरातील लहान मुलांचे डॉक्टर आता अधिक दक्ष झाले आहेत.

मुंबईमध्ये या आठवड्यातच पहिल्यांदा 14 वर्षांचा एक रूग्ण अंगावर रॅशेस आणि उच्च ताप या लक्षणांनी दाखल करण्यात आला आहे. दरम्यान ही दोन्ही कावासाकी ची लक्षणं आहेत. दरम्यान ही 14 वर्षीय रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह असून शुक्रवारी तिची प्रकृती खालवल्यानंतर आयसीयूमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तामधून समोर आले आहेत. या चिमुकलीच्या वडिलांकडून तिला कोरोनाची लागण झाली असल्याचं वृत्त समोर आलं आहे. COVID Toes: लहान मुले आणि तरुणांचे पाय सुजणे ठरतय धोक्याची घंटा; जाणून घ्या कोरोनाच्या 'या' नव्या लक्षणाविषयी.

The Journal of American Medical Association च्या अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार, जेव्हा 58 कोविड 19 आणि कावासाकी सदृश्य लक्षणांच्या मुलांवर अभ्यास केल्यानंतर त्यांच्यामध्ये ‘Paediatric Inflammatory Multisystem Syndrome' हा कोरोना व्हायरसच्या SARS-CoV-2 शी निगाडीत एक आजार जडत असल्याचं समोर आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने त्याला Multisystem Inflammatory Syndromeअसं नाव दिले आहे.

कावासाकी या आजारामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. प्रामुख्याने हा आजार पाच वर्षांखालील मुलांमध्ये आढळतो. यामध्ये उच्च ताप, रक्तवाहिन्यांमध्ये दाह तर काहींमध्ये कायस्वरूपी धमन्यांना नुकसान पोहचलेले असू शकते. Coronavirus केवळ फुफ्फुसांवर नव्हे तर मेंदू, हृद्य, किडनी सह शरीराच्या अन्य अवयवांवरही करतो घातक परिणाम; पहा COVID-19 चा रूग्णांच्या शरीरावर होणार्‍या गंभीर परिणामांबद्दल संशोधकांचा अभ्यास काय सांगतो.

महाराष्ट्रामध्ये 14,474 कोरोना रूग्ण हे 20 वर्षांपेक्षा कमी आहेत. सुमारे 5103 हे 10 वर्षांपेक्षाही कमी आहेत. तर 11 ते 20 वयोगटामध्ये अंदाजे 9371 जणांचा समावेश आहे. लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना अनावश्यक गर्दीच्या ठिकाणी नेऊ नये. त्यांना घरीच सुरक्षित ठेवण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

कावासाकी हा आजार म्हणजे कोरोना व्हायरसला इम्युनॉलॉजिकल रिअ‍ॅक्शन आहे. लहान मुलांमध्ये इम्युनिटी सिस्टिमला प्रतिसाद म्हणून हे लक्षण दिसू शकतं. मात्र अद्याप त्याचा ठोस पुरावा नाही. मुंबईसह देशभरात या आजावरही लक्ष ठेवले जात आहे. अद्याप या आजाराच्या सुरूवातीच्या स्थिती आहोत. त्यामुळे कोणतेही थेट तात्पर्य काढण्यासाठी अजूनही बरीच माहिती हाती असायला हवी असे प्रसिद्ध paediatric cardiac surgeon डॉ. बिसवा पांडा यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दिले आहे.