अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने आपल्या ट्विटर हँडलवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचा एकेरी उल्लेख करत एक व्हिडिओ शेअर केला आहे. 'उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तुला काय वाटते फिल्म माफीयासोबत माझे घर पाडून माझ्यासोबत मोठा बदला घेतला आहे?' असे ती या व्हिडिओत बोलताना दिसत आहे. अभिनेत्री कंगना रनौत ही आजच (9 सप्टेंबर 2020) मुंबई शहरात दाखल झाली. तत्पूर्वी मुंबई महापालिका प्रशासनाने कारवाई करत कंगना हिच्या पाली हिल येथील कार्यालयावर हातोडा चालवत पाडकाम केले. या कार्यालयात अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचा महापालिकेचा दावा आहे.
'उद्धव ठाकरे तुला काय वाटते फिल्म माफीयासोबत माझे घर पाडून माझ्यासोबत मोठा बदला घेतला आहे?' आज माझे घर तुटले आहे, उद्या तुझा अहंकार तुटेल. सर्वांचीच वळ सारखी राहात नाही. मला वाटते तू माझ्यावर मोठे उपकार केले आहेत. मला वाटत होते आमच्यासोबत असे काही होऊ शकेल. पण आता माझ्यासोबतही हे झाले. आता मी अयोध्या आणि जम्मू कश्मीर यांवरही एक चित्रपट बनवणार आहे, असे सांगतानाच शेवटी जय महाराष्ट्र आणि जय भारत असेही ती म्हणताना दिसत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एका खासगी वृत्तवाहिणीवरुन एकेरी उल्लेख करणाऱ्या संपादक, निवेदक अर्णव गोस्वामी यांच्या विरोधात राज्याच्या विधिमंडळात नुकताच हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्री कंगना रानौत हिच्यावरही हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. असे असतानाच कंगना रनौत हिने आणखी एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून काय प्रतिक्रिया येते याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, Sharad Pawar On Kangana Ranaut statement: कंगना रनौत हिच्या वक्तव्यावर शरद पवार यांची प्रतिक्रिया म्हणाले, 'या लोकांना उगाच अधिक महत्त्व दिलं जातंय')
तुमने जो किया अच्छा किया 🙂#DeathOfDemocracy pic.twitter.com/TBZiYytSEw
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020
दरम्यान, कंगना रनौत हिच्या कार्यालयात अवैध बांधकाम केल्याचा दावा करत मुंबई महापालिका प्रशासनाने कारवाई करत पाडकाम केले. मुंबई महापालिकेने कंगना रनौत हिच्या ज्या कार्यालयावर हातोडा चालवला, बुलडोजरने कारवाई केली. मुंबई महापालिकेच्या विरोधात कंगना रनौत हिने वकिलाच्या माध्यमातून न्यायालयात दाद मागितली आहे. न्यायालयाने महापालिकेच्या कारवाईला तूर्तास स्थगिती दिली आहे. त्यामुळे कंगना रनौत हिच्या कार्यालयातील पाडकाम सध्या थांबवण्यात आले आहे. दुसऱ्या बाजूला कंगना रनौत हिने पालिकेने केलेल्या कारवाईचे फोटो ट्विट करत पाकिस्तान असा पुन्हा एकदा उल्लेख केला आहे.