Representational Image | (Photo Credits: File Photo)

डोंबिवली (Dombivli) मधील अल्पवयीन मुलीवर (Minor Girl) झालेल्या सामूहिक बलात्काराची (Gang Rape) घटना ताजी असतानाच कल्याण (Kalyan) मध्ये एका अल्पवयीन मुलीवर शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, या प्रकरणी 42 वर्षीय ट्युशन टिचरला अटक करण्यात आली आहे. 8 वर्षीय पीडितेने आपल्यावर झालेल्या अत्याचाराबाबत पालकांना सांगितले. त्यानंतर पालकांनी बाजारपेठ पोलिस स्टेशन (Bazarpeth police station) मध्ये आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली. मुदर फकरुद्दीन तळवाला (Mudar Fakruddin Talvala) असे या आरोपीचे नाव आहे.

तळवाला आपल्या पत्नीसह घरातच ट्युशन्स घेतो. पत्नी माहेरी गेली असताना त्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Kerala: धक्कादायक! अल्पवयीन मुलगी बलात्कारानंतर राहिली गर्भवती; बाळाच्या जन्मानंतर भृण केला वॉशरूममध्ये फ्लश)

पीडित मुलगी ट्युशनला जाण्यास नकार देत असल्यामुळे तिच्या आईला काहीसा संशय आला. तिने मुलीला याबद्दल विचारले असता तिने ट्युशन टिचरच्या कृत्याबद्दल आईला सांगितले. त्यानंतर पीडितेच्या पालकांनी पोलिसांत धाव घेत आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून इतर मुलींसोबत आरोपीने अशा प्रकारचे कृत्य केले आहे का? याचा ते शोध घेत आहेत.

दरम्यान, डोंबिवली मध्ये 33 जणांकडून 14 वर्षीय मुलीवर झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. यापैकी 28 जणांना अटक असून दोन अल्पवयीन आरोपींना बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक नेमले आहे. या प्रकरणातील पीडितेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे.