Kerala: धक्कादायक! अल्पवयीन मुलगी बलात्कारानंतर राहिली गर्भवती; बाळाच्या जन्मानंतर भृण केला वॉशरूममध्ये फ्लश 

केरळच्या (Kerala) कोची (Kochi) येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जी ऐकून प्रत्येकालाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) झाला, त्यानंतर ती गर्भवती राहिली. पुढे तिने कोची येथील एका खाजगी रुग्णालयाच्या वॉशरूममध्ये अकाली बाळाला जन्म दिला आणि नंतर तो भृण (Foetus) फ्लश केला. अहवालांनुसार, या अल्पवयीन मुलीवर 20 वर्षीय तरुणाने कथितपणे बलात्कार केला, त्यानंतर ती गर्भवती झाली. बुधवारी, ती तिच्या आईसह कोची येथील एका खासगी रुग्णालयात तपासणीसाठी गेली होती.

रुग्णालयात औषधाची वाट पाहत असताना या मुलीच्या पोटात वेदना सुरु झाल्या व ती वॉशरूममध्ये गेली, जिथे तिने अकाली बाळाला जन्म दिला. त्यानंतर तिने नवजात बाळाला शौचालयात फ्लश केले आणि स्कॅनिंग रूममध्ये परतली. यावेळी तिने मुलाला जन्म दिल्याबाबत माहिती दिली नाही. हे प्रकरण तेव्हा उघडकीस आले जेव्हा दुसरा रुग्ण शौचालयात गेला आणि त्याने अकाली जन्मलेल्या गर्भाचे अवशेष पाहिले.

याबाबत पोलिसांना माहिती मिळताच ते रुग्णालयात पोहोचले. एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार, या मुलीने चौकशीदरम्यान कबूल केले आणि सांगितले की तिने जन्मलेल्या बाळाला शौचालयात फेकून दिले होते. मुलीने पुढे सांगितले की 20 वर्षीय तरुणाने तिच्यावर बलात्कार केला, त्यानंतर ती गर्भवती झाली. पोलिसांनी तिच्या आईच्या तक्रारीच्या आधारे आरोपीविरुद्ध वायनाडमध्ये गुन्हा दाखल केला आहे. (हेही वाचा: Punjab: धक्कादायक! तरुणांची फसवणूक करून महिलेने केली 8 लग्ने; आता निघाली HIV Positive)

अन्य एका घटनेत उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यातील जगदीशपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 17 वर्षीय मुलीवर तिच्या मित्राच्या 21 वर्षीय भावाने बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही मुलगी 21 ऑगस्ट रोजी शेतात गेली होती. आरोपी, ज्याची ओळख सुनील आहे, त्याने बहिणीच्या मदतीने या मुलीचे अपहरण केले. यानंतर सुनीलने मुलीच्या कपाळावर कुंकू लावले आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला.