Punjab: धक्कादायक! तरुणांची फसवणूक करून महिलेने केली 8 लग्ने; आता निघाली HIV Positive
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : pixabay)

पंजाबच्या (Punjab) पटियाला (Patiala) जिल्ह्यात पोलिसांनी तब्बल 8 लग्न करून, सासरच्या लोकांकडून दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळून गेलेल्या एका महिलेसह 4 जणांना अटक केली आहे. या महिलेबाबत समोर आलेले सत्य ऐकून तिचे आठही नवरे तसेच पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आठवड्यापूर्वी पकडलेल्या या वधूची पोलिसांनी एचआयव्ही (HIV) चाचणी केली. आता माहिती मिळत आहे की, या आरोपी महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आता पोलीस तिच्याशी लग्न करणाऱ्या आठही जणांची एचआयव्ही करणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही तरुणी आपल्या 3 साथीदारांसह एक टोळी तयार करून तरुणांना फसवत असे. लग्नानंतर, ही मुलगी सासरचे मारहाण करीत आहेत व हुंड्याची मागणी करत आहेत असे दाखवून भांडण करायची व पंचायत बोलावायची. त्यानंतर घटस्फोट घेऊन ती सासरचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळून जायची. या कामात तिची आईसुद्धा तिला साथ देत असे.

अशाप्रकारे फसवणूक झालेल्या 8 पैकी 3 जण हरियाणाचे आहेत. पटियालाच्या जुल्का परिसरात नवव्या वराला शोधत असताना तिला पकडण्यात आले. जिथे तिचे लग्न झाले होते व ती हनिमून नंतर एक आठवड्यानंतर परत आली होती. अशा परिस्थितीत तिच्याकडून फसवणूक झालेल्या सर्व तरुणांसाठी एड्सचा धोका निर्माण झाला आहे. (हेही वाचा: Chennai: उधार भागवण्यासाठी दोन बहिणींनी आपल्या अल्पवयीन मुलींवर दुकानदाराला करू दिला बलात्कार; सापडले 50 अश्लील व्हिडिओ)

आरोपी महिला हरियाणाच्या कैथल जिल्ह्यातील रहिवासी असून तिचे वय 30 वर्षे आहे. आरोपी महिलेचे खरे लग्न 2010 मध्ये पटियाला येथे झाले, ज्यातून तिला तीन मुले झाली. त्यांची वये 7 ते 9 वर्षांच्या दरम्यान आहे. यानंतर अचानक तिचा नवरा गायब झाला. या महिलेने आपल्या पतीला घटस्फोटही दिला नाही. चार वर्षांपूर्वी तिने अशाप्रकारे तरुणांना फसवणे सुरु केले. ती पंजाब आणि हरियाणातील अविवाहित, घटस्फोटित किंवा विधुर पुरुषांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांच्याशी लग्न करत असे.