Chennai: उधार भागवण्यासाठी दोन बहिणींनी आपल्या अल्पवयीन मुलींवर दुकानदाराला करू दिला बलात्कार; सापडले 50 अश्लील व्हिडिओ
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

आई आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना तमिळनाडूमधील (Tamil Nadu) चेन्नई (Chennai) येथे घडली आहे. तुम्ही मुलींसोबत शारीरिक अत्याचाराच्या अनेक घटना ऐकल्या असतील, मात्र चेन्नई येथे चक्क एका आईने दुकानदाराकरवी आपल्या मुलीवर बलात्कार करवला आहे. दुकानातून सामान आणल्याच्या बदल्यात दुकानदाराने या मुलींवर बलात्कार केला, ज्यासाठी मुलींच्या आईने मदत केली. इतकेच नाही तर या गोष्टीचा व्हिडिओदेखील बनवण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी दुकानदाराकडून अल्पवयीन मुलींचे तब्बल 50 अश्लील व्हिडिओ जप्त केले आहेत.

टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, पोलिसांनी आरोपी दुकानदाराची ओळख 48 वर्षीय पेरुमल म्हणून केली आहे. या ठिकाणी दोन सख्ख्या बहिणींनी दुकानदाराचे उधार चुकते करण्याच्या बदल्यात, आपल्या अल्पवयीन मुलींवर बलात्कार करण्याची आणि या लज्जास्पद घटनेचा व्हिडिओ बनवण्याची परवानगी दिली. एवढेच नाही तर या दोन बहिणींनी त्यांच्या मुलींशिवाय इतर तीन मैत्रिणींचा बलात्कारही या दुकानदाराकडून करवला.

अशा प्रकारे दोन्ही बहिणींनी दुकानदाराला 5 जणींवर बलात्कार करण्यासाठी मदत केली. हा दुकानदार बंदी असलेली तंबाखू विकत असल्याची बातमी पोलिसांना मिळाली तेव्हा हे भयानक प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी दुकानावर छापा टाकला आणि बंदी घातलेल्या तंबाखू सोबत, मोबाईल देखील जप्त करण्यात आला. या मोबाईलमध्ये त्यांना अल्पवयीन मुलींवर केलेल्या क्रौर्याचे 50 व्हिडिओ सापडले.

सुरुवातीला पोलिसांना वाटले की आरोपी दुकानदाराने इंटरनेटवरून हे अश्लील व्हिडिओ डाऊनलोड केले असतील. पण जेव्हा त्यांनी या व्हिडिओची तपासणी केली तेव्हा पेरूमल व्हिडिओमध्ये दिसला. यानंतर पोलिसांनी दुकानदार पेरुमलची चौकशी केली, तेव्हा त्याने सर्व गोष्टी काबुल केल्या. त्याने पोलिसांना सांगितले की त्याने गेल्या 6 महिन्यांत 5 अल्पवयीन मुलींवर बलात्कार केला होता. (हेही वाचा: काय सांगता? 17 वर्षांच्या मुलाला पळवून घेऊन गेली 19 वर्षांची मुलगी; लैंगिक शोषण करून लग्न केल्याचा आरोप; POCSO अंतर्गत गुन्हा दाखल)

घटनेचा खुलासा झाल्यानंतर पोलिसांनी दुकानदार पेरुमल या दोन आरोपी बहिणींना अटक केली आहे आणि त्यांच्यावर भादंविच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.