कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. परिणामी, उद्योगधंदे, व्यवसाय, वाहतुकीसह बऱ्याच गोष्टी ठप्प झाल्या आहेत. ज्यामुळे बरोजगारीच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत ( Dr.Nitin Raut) धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील तरुणांना नोकरीच्या संधीच्या रुपात एक आगळी-वेगळी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील ऊर्जा विभागाच्या महापारेषण (Mahapareshan) या वीज कंपनीत जवळपास 8500 तांत्रिक श्रेणीतील रिक्त पदे भरण्याचे त्यांनी यांनी आज आदेश दिले आहेत. यामुळे राज्यात मेगा-भरतीचा मार्ग मोकळा झाल्याने हजारो तरुणांच्या नोकरीचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
डॉ. नितीन राऊत यांच्या सुचनेनुसार महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी हा पदभरती प्रस्ताव तयार करून सादर केला. नुकतीच मंत्रालयात महापारेषण भरतीबाबत चर्चा झाली. दरम्यान, 8500 तांत्रिक श्रेणीतील रिक्त पदे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश डॉ. निती राऊत यांनी दिले आहेत. या भरतीमुळे आय.टी.आय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर नोकरीची संधी उपलब्ल होणार आहे. हे देखील वाचा-नागरिकांसाठी खुशखबर! लवकरच अवघ्या 40 मिनिटांत Water Taxi च्या माध्यमातून नवी मुंबई गाठता येणार
ट्विट-
ऊर्जा विभागाच्या महापारेषण या वीज कंपनीत तांत्रिक श्रेणीतील ८ हजार ५०० रिक्त पदे भरण्याचे ऊर्जामंत्री @NitinRaut_INC यांचे आदेश. यंत्रचालक व तंत्रज्ञ संवर्गाचे एकत्रीकरण करण्याचाही निर्णय. तांत्रिक संवर्गातील ६७५० व अभियंता संवर्गातील १७६२ पदांच्या मेगाभरतीची महापारेषणकडून तयारी. pic.twitter.com/WM1SZ9p6w0
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) October 23, 2020
महापारेषणमध्ये तांत्रिक श्रेणीतील 8 हजार 500 पदांची ही भरती प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे. तांत्रिक संवर्गातील 6750 पदे व अभियंता संवर्गातील 1762 पदांची मेगा भरती करण्यासाठी महापारेषण व्यवस्थापन तयारी करीत आहे. महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे 2005 साली महावितरण, महापारेषण, महानिर्मिती आणि सूत्राधारी कंपन्यांमध्ये विभाजन झाल्यानंतर महापारेषण कंपनीत रिक्त पदांची सांख्य वाढत गेली आणि अपेक्षित भरतीदेखील करण्यात आली नाही.