नागरिकांसाठी खुशखबर! लवकरच अवघ्या 40 मिनिटांत Water Taxi च्या माध्यमातून नवी मुंबई गाठता येणार
Water Taxi (Photo Credits-Twitter)

मुंबई पोर्ट ट्रस्ट (Mumbai Port Trust)  कडून पुढील महिन्यापासून शहरातील डोमेस्टिक क्रुज टर्मिनल (DCT) येथून वॉटर टॅक्सी सुरु करण्याचा विचार करत आहे. तर मुंबई पोर्ट ट्रस्टकडून वॉटर टॅक्सी (Water Taxi)  मुंबई ते बेलापूर, वाशी, जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट (JNPT) आणि मानवासाठी सुरु केली जाणार आहे. अधिकाऱ्यांनी असे म्हटले आहे की, वॉटर टॅक्सी सुरु करण्यासाठी त्यांनी सहा कंपन्यांची नावे निवडली आहेत. ज्या या वॉटर टॅक्सीचा कारभार सांभाळतील. त्यापैकी एक किंवा दोन कंपन्यांकडून मिळून ही वॉटर टॅक्सीची सर्विस लवकरच सुरु केली जाऊ शकते.(Unlock 5: BEST Buses ना पूर्ण क्षमतेने प्रवास करण्यास महाराष्ट्र सरकारची परवानगी)

वॉटर टॅक्सी सुरु केल्यास नागरिकांना अवघ्या 40 मिनिटांत नवी मुंबईत पोहचता येणार आहे. यामुळे दीड तासांचा रस्ते वाहतूकीने करण्यात येणाऱ्या प्रवासाचा वेळ यामुळे वाचणार आहे. कॅप्टन बाबतोश चंद यांनी असे म्हटले की, वॉटर टॅक्सीसाठी सेवा शुल्क हे ऑपरेटर्स कडून ठरवले जातील.(Colour-Coded E-Pass: मुंबई लोकल मध्ये गर्दीचं नियोजन करण्यासाठी 'कलर कोडेड ई पास' यंत्रणेचा होतोय विचार; जाणून घ्या काय आहे हा पर्याय!)

तर फेब्रुवारी 2020 मध्ये मुंबई पोर्ट ट्रस्टकडून रोरो सेवा ही साउथ मुंबई ते अलिबाग अशी सुरु केली केली गेली होती. मात्र 20 ऑगस्टला पुन्हा रोरो सेवा सुरु झाल्यानंतर त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसला होता. रोरो सेवा चालवणाऱ्या M2M Ferries Pvt Ltd यांच्या मते, 5 हजारांहून अधिक प्रवासी, 270 दुचाकी आणि सायकल चालकांसह 1200 कार यांनी ऑगस्ट 20 ते सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रोरो सेवेच्या माध्यमातून प्रवास केला आहे.